Uddhav Thackeray-Kejiriwal Saam TV
मुंबई/पुणे

Political News: पक्ष, चिन्ह चोरलं तरी उद्धव ठाकरे वाघच, सुप्रीम कोर्टात न्याय मिळण्याची केजरीवालांना आशा; भाजपवर टीकास्त्र

शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली आहे. महागाई वाढत आहे. मात्र सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही, खर्च वाढत आहे. केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

देशात एक पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबाबत विचार करत असतो. आम्ही लोकांच्या प्रश्चांचा विचार करत असतो. शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावरही अरविंद केजरीवालांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष चोरला, पक्षचिन्ह चोरले. मात्र उद्धव ठाकरेंचे वडील (दिवंगत बाळासाहेब ठाकरे) वाघ होते आणि ते वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. सुप्रीम कोर्टातून त्यांना न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो, असं केजरीवाल यांनी म्हटलं.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंना भेटण्याची आज संधी मिळाली. पंजाब आणि महाराष्ट्राचं अनोखं नातं आहे. भगतसिंह पंजाबचे होते तर राजगुरु पुण्याचे होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे.

मात्र आता देशाचे लचके कोण तोडत आहे. अनेक लोक देश लुटून परदेशात पळून जात आहेत. हे कुणामुळे झालं आहे. देशाचं हित कसं साधलं जाईल, लोकांची प्रगती कशी होईल, या मुद्यांवर आमची चर्चा झाली असल्याचं, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT