Sambhajinagar: बाळासाहेब ठाकरेंची ती ऐतिहासिक सभा अन् त्यांचं स्वप्न...; जाणून घ्या 'संभाजीनगर'च्या नामांतराचा ३४ वर्षापूर्वीचा इतिहास....

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. जाणून घेवूया संभाजीनगरच्या नामांतराचा सविस्तर ३४ वर्षापुर्वीचा इतिहास....
SambhajiNagar
SambhajiNagarSaamtv
Published On

Aurangabad Renamed As Chhatrapati Sambhajinagar: औरंदाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यास आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावे, अशी शिवसेनेची मागणी होती.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) सर्वप्रथम औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. जाणून घेवूया संभाजीनगरच्या नामांतराचा सविस्तर इतिहास...

SambhajiNagar
Maharashtra: मोठी बातमी! औरंगाबाद आता ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे झाले ‘धाराशिव’; नामकरणाला केंद्राची मंजुरी

34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी केली होती घोषणा...

सर्वप्रथम १९८८ मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेने इंट्री मारली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. पण ३ नगरसेवकाअभावी सत्ता स्थापन होऊ शकली नाही. मात्र, शिवसेनेने पहिल्याच निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं. या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वतीनं शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा झाली. ८ मे १९८८ रोजी झालेल्या या विजयी सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करणार अशी घोषणा केली.

इतकंच नाही तर आजपासूनच संभाजीनगर म्हणा, अशी सूचना शिवसैनिकांना केली. तेव्हापासून शिवसेनेकडून संभाजीनगर केला जातो. पुढे काही महिन्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून संभाजीनगर नावाचा उल्लेख सुरुवात झाली. पण बाळासाहेबांचे स्वप्न, शिवसेनेची अस्मिता म्हणून शिवसेना नेत्यांकडून संभाजीनगरच्या नावाचा आग्रह कायम राहिला. त्यानंतर औरंगाबादचं राजकारण 'संभाजीनगर' नावाभोवती फिरू लागलं.

SambhajiNagar
Sharad Pawar: 'फार भांडखोर आहे तिला....' रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव घेताच शरद पवारांचे विधान; नेमक काय झालं?

शिवसेनेचा होता आग्रह...

त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूका या शहरातल्या इतर मुद्द्यासोबत संभाजीनगरवर फिरू लागल्या. आणि शिवसेनेला शहरातून मोठं यश मिळत गेलं. राज्यात शिवसेनेची सत्ता आली की संभाजीनगर नामकरण करू असं आश्वासन शिवसेनेकडून दिलं गेलं. याला त्यावेळी भाजपचा पाठिंबाही मिळाला.

याकाळात भाजप-शिवसेना युतीची सत्ता टिकवण्यात यश मिळत गेलं. पण मुद्दा हा तसाच चर्चेत कायम राहत गेला. १९९५ मध्ये राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता आली. त्यावेळी १९ जून १९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याचा ठराव औरंगाबाद महापालिकेने मंजुर केला.

१९९५ मध्ये पहिल्यांदा झाला होता ठराव..

महानगरपालिकेने मंजूर केलेले ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्यावेळी राज्यात युतीच सरकार असल्याने अवघ्या ५ महिन्यात औरंगाबादचे नाव संभीजीनगर करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली. लगेच तत्कालीन मंत्रिमंडळानं संभाजीनगर नावाला मंजुरी दिली. पण घोडं अडलं. राज्य सरकारच्या या निर्णायाला औरंगाबादचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिलं.

पुढे हा विषय निकाली निघाला. मात्र, राज्यात पुन्हा काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी २००१ या वर्षात संभाजीनगरचा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे याचिकाही रद्द झाली आणि आतापर्यंत हा मुद्दा केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत येऊ लागला.

त्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या काळात फोडणी मिळायची. २०१४ मध्ये पुन्हा राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर आता संभाजीनगर होईल, अशी आशा निर्माण झाली, पण त्याकाळात फारशे प्रयत्न झाले नाहीत. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात सर्व अहवाल मागवले, त्यासाठी वेगवेगळ्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले.

मार्च २०२० मध्ये औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे ठेवण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली . तथापि, केंद्राकडून यास अद्याप परवानगी मिळाली नाही. २०११ मध्ये शहराची जनगणना झाली. त्यावेळी जवळपास ५१ टक्के हिंदू आणि ३०.८ टक्के मुस्लिम असल्याची आकडेवारी होती. त्यामुळे साहजिकच संभाजीनगर या नावाला पसंती मिळतंय असा दावा इतिहास कारांकडून केला जातो. (SambhajiNagar)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com