Sharad Pawar: 'फार भांडखोर आहे तिला....' रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव घेताच शरद पवारांचे विधान; नेमक काय झालं?

एका प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रुपाली पाटील यांच्या आक्रमक पणाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. (Sharad Pawar On Rupali Thombare Patil)
Sharad Pawar Rupali Thombare
Sharad Pawar Rupali Thombare Saamtv
Published On

Pune: रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राज्यातील कोणताही वाद असो किंवा आंदोलने असो रुपाली पाटील त्यांचे रोखठोक विधान करत असतात. त्यामुळेच त्यांच्या नावाची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

आज पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रुपाली पाटील यांच्या आक्रमक पणाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. (Sharad Pawar On Rupali Thombare Patil)

Sharad Pawar Rupali Thombare
Eknath Shinde: 'शहांना विजयी भेट देणे ही आपली जबाबदारी...' CM शिंदेंचे पुणेकरांना आवाहन; उद्धव ठाकरेंवर केला जोरदार हल्लाबोल

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पवार (Sharad Pawar) यांना आज पत्रकारांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर कुणाविषयी बोलताय? असं शरद पवार म्हणाले मग रुपाली ताई ठोंबरे पाटील असं पत्रकाराने सांगितल्यावर शरद पवार चटकन म्हणाले "भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट अंगावर जाते त्यांच्या. तिला आवरावं लागतं,". त्यांनी असे म्हणताच पत्रकारांमध्येही जोरदार हशा पिकला.

मनसेतून केला होता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश...

रुपालीताई ठोंबरे पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. कोणताही प्रश्न आक्रमकपणे मांडणे, महिलांच्या प्रश्नांना न्याय देणे, याबद्दल त्या नेहमी आग्रही असतात. त्यांच्याबद्दल खुद्द शरद पवारांनी भांडखोर आहे, असे म्हणल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे..

Sharad Pawar Rupali Thombare
Meerut News : मेरठमध्ये भीषण दुर्घटना, कोल्ड स्टोरेजची भिंत पडल्याने ५ कामगारांचा मृत्यू, काही जण अडकल्याची भीती

दरम्यान, पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. आजचान प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) राज्यभरातील दिग्गज नेते मंडळींनी पुण्यात तळ ठोकला आहे. येत्या २८ फेब्रूवारीला मतदान होणार असून, २ मार्चला मतमोजणीसह अंतिम निकाल जाहीर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com