udayanraje bhosale statement on shiv sena mla disqualification result  Saam TV
मुंबई/पुणे

Udayanraje Bhosale On MLA Disqualification Result : आमदार अपात्रतेच्या निकालावर उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टाेला

जास्त दिवस घोगडे भिजत ठेवले तर चीड येतेच असेही उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देताना नमूद केले.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News :

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narwekar) यांनी निकाल दिला आहे. लोकांची मान्यता असती, लोकांचा आदर केला पाहिजे, परिस्थिती बदलत असते असे मत खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालाच्या (MLA Disqualification Result) पार्श्वभूमीवर व्यक्त केले. अशी परिस्थिती का झाली याचा विचार त्या पक्षाने (उबाठा शिवसेनेचे नाव घेता) केला पाहिजे असा टाेला खासदार भाेसलेंनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली. विभागीय आयुक्त कार्यलयात झालेल्या या बैठकीस सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित हाेते. (Maharashtra News)

या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भाेसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आजची बैठक सकारात्मक झाली. आमच्या काही मागण्या आहेत. त्या संदर्भात चर्चा झाली. जास्तीत जास्त निधी सातारा जिल्हयाला मिळेल अशी आशा आहे. सातारा जिल्हा डोंगरी आहे, दुर्गम भाग आहे. काही ठिकाणी जाता येत नाही. तेथे साेयी सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी जास्तीत जास्त निधी मागितला आहे.

दरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे नार्वेकर यांनी निकाल दिला आहे असे मत उदयनराजेंनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालावर बाेलताना व्यक्त केले. ते म्हणाले लोकांची मान्यता असती, लोकांचा आदर केला पाहिजे. परिस्थिती बदलत असते अशी परिस्थिती का झाली याचा विचार त्या पक्षाने असेही राजेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT