Satara Lok Sabha: उदयनराजेंचे तुम्हांला आव्हान असणार? 'लाेकशाहीत स्वत:ला काेणी माेठं समजू नये' (पाहा व्हिडिओ)

काॅंग्रेसचे विचार जनतेपर्यंत पाेहचविणे हेच आमचे ध्येय असणार आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSaam TV

- अक्षय बडवे

Pune News :

सातारा (satara) जिल्ह्यात काेणी किती माेठे असले तरी लाेकशाहीत मतदार हा राजा ठरविणार आहे. पूर्वी राजाचा मूलगा राजा हाेत हाेता आज लाेकशाहीच्या मतपेटीतून राजा ठरत असताे. त्यामुळे काेणी स्वत:ला माेठे न समजता लाेकशाहीच्या दरबारात मतदार राजा हा ठरवताे असे उत्तर आमदार रवींद्र धंगेकर (mla ravindra dhangekar) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांचे साता-यात तुमच्यासमाेर आव्हान असणार आहे या प्रश्नास उत्तर देताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काॅंग्रेस पदाधिका-यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघाची (satara lok sabha constituency) जबाबदारी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे साेपविण्यात आली आहे.

Udayanraje Bhosale
Mla Nitin Deshmukh News : गावगुंडाविराेधात उबाठा शिवसेना आक्रमक, उद्या अकाेल्यात मूक मोर्चा

आज माध्यमांनी आमदार धंगेकर यांना उदयनराजे भाेसले यांचे साता-यात तुमच्यासमाेर आव्हान असणार आहे तसेच ते भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना तुम्ही काॅंग्रेस पक्षात आणणार का असा प्रश्न विचारला असता धंगेकरांनी मी काॅंग्रेसचा छाेटा कार्यकर्ता आहे. काॅंग्रेसचे विचार जनतेपर्यंत पाेहचविणे हेच आमचे ध्येय असणार आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे विचार रुजविले जातील.

सध्या आमची सत्ता नाही. त्यामुळे प्रथमत: जनतेचे प्रश्न समजून घेत ते साेडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. उदयनराजेंबाबत पक्षाचा नेते निर्णय घेतील असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले.

Udayanraje Bhosale
Social Media तून Shambhuraj Desai यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल; शिवसेना पदाधिका-याची हकालपट्टी हाेणार? (पाहा व्हिडिओ)

या पदाधिका-यांकडे जबाबदारी

लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काॅंग्रेस पदाधिका-यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. यामध्ये पुणेची जबाबदारी विश्वजीत कदम, अहमदनगरची माजी आमदार मोहन जोशी, साता-याची आमदार रवींद्र धंगेकर, माढ्याची संजय बालगुडे तसेच हातकणंगलेची अभय छाजेड यांच्याकडे जबाबदारी साेपविण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Udayanraje Bhosale
Ramdas Athawale On Lok Sabha Election: रामदास आठवलेंची लोकसभा लढविण्याची इच्छा, मतदारसंघही ठरला; RPI ला हव्यात दाेन जागा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com