tur dal price rised in vashi apmc navi mumbai Saam Digital
मुंबई/पुणे

APMC Market Vashi : तूरडाळीचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, जाणून घ्या एपीएमसीमधील स्थिती

Tur Dal Price : मोझंबिक देशाबरोबर तूरडाळ आयात करण्याचा भारताने करार केला होता. मात्र, ती आयात देखील थांबली असून त्याचा परिणाम डाळींच्या दरवाढीवर झाला आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai :

तूरडाळीची आवक घटल्याने नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे भाव वधारले आहेत. एपीएमसी घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वधारले असून 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने तूरडाळीची विक्री हाेत आहे. तर किरकोळ बाजारपेठेत 200 ते 225 रुपये प्रतिकिलोने तूरडाळीची विक्री केली जात आहे. (Maharashtra News)

भारतात आफ्रिकन देशातून डाळींची आयात सुरू होती. ती मागील दोन महिन्यांपासून बंद झाल्याने डाळींचा तुटवडा भासू लागलाय. मोझंबिक देशाबरोबर तूरडाळ आयात करण्याचा भारताने करार केला होता. मात्र, ती आयात देखील थांबली असून त्याचा परिणाम डाळींच्या दरवाढीवर झाला आहे.

एपीएमसी घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वधारले आहेत. या ठिकाणी तूरडाळीचा दर 150 ते 200 रुपये प्रति किलो असा आहे. किरकोळ बाजारपेठेत 200 ते 225 रुपये प्रतिकिलोने तूरडाळीची विक्री करण्यात येतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पावसाळा वेळेत सुरु झाल्यास आणि आवक वाढल्यास तूर डाळीचे दर घसरतील मात्र पुढील काही दिवस तूरडाळीचे दर चढेच राहणार असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

SCROLL FOR NEXT