पापळवाडी अपघातात १० महिलांचा मृत्यू, २१ जखमी
कुंडेश्वर दर्शनाला जात असताना पिकअप दरीत कोसळली
चालकावर गुन्हा दाखल करून अटक
रात्री साडेबारा वाजता सामूहिक अंत्यसंस्कार, गाव शोकमग्न
Pune accident 10 women dead : पुण्यातील खेड तालुक्यातील पापळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप वाहनाला अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेत १० महिलांचा मृत्यू झाला असून २१ महिला गंभीर जखमी आहेत. रात्री साडेबारा वाजता गावातीलच 10 महिलांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव हळहळून रडले, शोकमग्न वातावरणात हंबरडा फोडला. गावातील प्रत्येक घरात चूल विझली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातामधील जखमी महिलांवर उपचार सुरू असून, या अपघाताने पापळवाडी आणि परिसरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त भाविक कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. नागमोडी वळणावर घाट चढताना पिकअप रिटर्न आल्याने भाविकांचं वाहन थेट १०० फूट खोल दरीत कोसळलं. या अपघातात १० महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
कुंडेश्वर अपघात, चालकावर गुन्हा दाखल , चालकाला अटक Pune driver arrested after pickup falls into gorge
खेड तालुक्यातील कुंडेश्वर अपघातातील पिकअपचा चालक ऋषिकेश रामदास करंडे (वय २५) याच्यावर रात्री उशीरा विविध कलमानुसार महाळुंगे MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी रात्री उशीरा त्याला ताब्यात घेतलंय. कुंडेश्वरला जात असताना घाटरस्ता चढताना पिकअप गाडी चढावर असताना अचानक मागे आली, चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दरीत कोसळून पलटी झाले. यावेळी चालकाने उडी टाकल्याने तो वाचला.
पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.