Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Pune hadapsar slide collapse child death: पुण्यातील हडपसरमध्ये घसरगुंडी अंगावर कोसळून एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यातील हडपसरमध्ये भीषण अपघात

  • घसरगुंडी कोसळून ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

  • सोसायटीच्या निष्काळजीपणाचा आरोप

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भयंकर घटना घडली. गार्डनमध्ये खेळताना अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू झाला. पुण्यातील हडपसरमध्ये ही घटना घडली. सोसायटीतील गार्डनमध्ये खेळताना या मुलीच्या अंगावर घसरगुंडी कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील मगरपट्टा परिसरात ही घटना घडली. सोसायटीच्या आवारात लोखंडी घसरगुंडी अंगावर कोसळून साडेचार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अनिका नवनाथ देवीकर असं साडेचार वर्षांच्या मृत मुलीचे नाव होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीत लहान मुलांसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी घसरगुंडीचा आधार व्यवस्थित नसल्याने ती अचानक कोसळली. या अपघातात अनिकाच्या डोक्याला,चेहऱ्याला आणि मानेस गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेपूर्वी घसरगुंडी व्यवस्थित बसविलेली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. ती काढून टाकण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

SCROLL FOR NEXT