Mumbai-Pune Express Way Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way Accident: ट्रॅफिक जाम, कडक ऊन, प्यायला पाणी नाही... टँकर अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांचे प्रचंड हाल

Khandala Ghat: एकाच ठिकाणी गेल्या 5 तासांपासून ही वाहनं अडकून (Traffic Jam) पडली आहेत.

Priya More

Khandala News: मुंबई-पुणे एक्सप्रेस (Mumbai-Pune Express Way) वेवरील खंडाळा घाटात (Khandala Ghat) मंगळवारी टँकरला अपघात झाला. अपघातानंतर टँकरने पेट (Tanker Accident) घेतला. या बर्निंग टँकरमुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी गेल्या 5 तासांपासून ही वाहनं अडकून (Traffic Jam) पडली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातानंतर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. पर्यायी मार्ग नसल्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल याची हे प्रवासी वाट पाहत आहेत. एकाच ठिकाणी गेल्या पाच तासांपासून प्रवासी अडकल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहे. प्रचंड ऊन, त्यात गरम होत आहे अशामध्ये हे प्रवासी रस्त्यावर उभे राहिले आहेत.

या प्रवाशांमध्ये लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहे. काहींना महत्वाच्या कामासाठी जायचे आहे, काहींच्या घरी नातेवाईक आजारी आहे त्यांना भेटायचे आहे, तर कोणाच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे. अशा महत्वाच्या कामासाठी निघालेले प्रवासी एकाच ठिकाणी अडकले आहेत. प्रवाशांचे हाल पाहून स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. प्रवाशांसाठी पाण्याच्या पाण्याची आणि खाण्याची सोय करुन दिली जात आहे.

पुण्यावरुन काही जण हज यात्रेसाठी निघाले आहेत. ते देखील या ट्राफिकमध्ये अडकले आहेत. हजला जाण्यासाठी त्यांची साडेपाच वाजताची मुंबई एअरपोर्टवरुन फ्लाईट होती. पण आता त्यांना फ्लाईटच्या वेळेत पोहचता येणार नसल्यामुळे त्यांचे हजला जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांच्यासोबत असलेले काही जण पुढे निघून गेले आहेत. त्यांना हजला जाता येणार आहेत. पण आता या घटनेमुळे ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे या सर्वांना हजला जाता येणार नसल्यामुळे ते नाराज झाले आहेत.

दरम्यान, पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या टँकरला अपघात झाला. अपघातानंतर टँकरने जागीच पेट घेतला. या टँकरमध्ये मिथाईल केमीकल होतं. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. या आगीने रौद्ररुप धारण केले. काही वेळापूर्वी जोरदार पाऊस झाला त्यामुळे आग काहिशी नियंत्रणात आली होती. पण पाऊस थांबल्यानंतर आग पुन्हा वाढू लागली. गेल्या पाच तासांपासून आग धुमसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT