Ashadhi Wari Video: वर्दीतले वारकरी! विठूनामाच्या गजरात पोलीसही झाले दंग; वारकऱ्यांसोबत धरला ठेका... VIDEO

Police Dance In Ashadhi Wari Viral Video: विठूनामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत पोलीसही हरिनामात दंग होतात, ज्याचा एक सुंदर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे...
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saamtv
Published On

Ashadhi Wari 2023 Police Dance Viral Video: वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. पंढरपुरची वारी आयुष्यात एकदा तरी करावी असे सांगितले जाते.

सध्या राज्यात वारीचा उत्साह सुरू आहे. या वारी सोहळ्यासाठी महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करताना दिसत आहेत. सर्वत्र विठू नामाचा गजर ऐकून त्यांनाही वारीत दंग व्हावेसे वाटणार की, सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलिसांचा असाच एक सुंदर व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसांनीही टाळ गजराच्या तालात ठेका धरल्याचे दिसत आहे.,

Ashadhi Wari 2023
Chhatrapati Sambhajinagar: बायको आणि मुलाच्या भेटीची ओढ; रस्त्यातच बापावर काळाचा घाला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात.

वारकऱ्यांच्या या भक्तीला साथ देतात महाराष्ट्र पोलिस. वारी काळात दिवसरात्र बंदोबस्त देणारे पोलिसही एक प्रकारे विठूरायाची सेवाच करत असतात. अशावेळी विठूनामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत पोलीसही हरिनामात दंग होतात. असाच एक पोलिसांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Ashadhi Wari 2023
Dhanodi Bahaddarpur Fire News : धानोडी बहाद्दरपुरात भीषण आग, सिंचनाचे काेट्यावधीचे साहित्य जळाले

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस गर्दीत वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या हरिनामात दंग झाले आहेत. उन्हातानात वारकरी चालत चालत पंढरपूरकडे जात आहेत. अशावेळी वारकऱ्यांसोबत पोलीसही वारीत तल्लीन झाल्याचे बघायला मिळत आहे.

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, हे कडवे या व्हिडीओला लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, सध्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामास आहेत. लाखो वारकरी वारीसोबत पुण्यात दाखल झाले आहेत. यात वृद्ध, अपंग वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com