Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSaam TV

Chhatrapati Sambhajinagar: बायको आणि मुलाच्या भेटीची ओढ; रस्त्यातच बापावर काळाचा घाला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

या घटनेत रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला वाहनाने जोरदार धडक दिली आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात अपघाताच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नागरिक सर्रास वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. वाहन चालकांच्या चुकांमुळे आजवर अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. आता देखील छत्रपती संभाजीनगर येथून अपघाताची अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला वाहनाने जोरदार धडक दिली आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, पैठण ते छत्रपती संभाजी नगर रोडवरील सह्योग नगर जवळील दुर्गा प्रायमरी स्कूल समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमीचे नाव सखाहरी मुचक असे आहे. सखाहरी बाहेर दूसऱ्या शहरात कामाला असून बायको आणि मुलाला भेटण्यासाठी घरी चालले होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

Chhatrapati Sambhajinagar
Akola Crime News: धक्कादायक! त्याने तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले; मग व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

रस्त्याने येत असताना एक अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे थेट हवेत उडून खाली पडले. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामीण रूग्णालय बिडकिन येथे प्राथमिक उपचार घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदपाठक यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला आहे.

सखाहरी आपली पत्नी आणि मुलगी यांच्यापासून लांब दुसऱ्या शहरात नोकरी करतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी जात होते. घरी जात असताना अचानक त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार बसली की त्यात त्यांच्या डोक्याला बराच मार लागला आहे. पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी जात असताना आपल्यासोबत असे काही घडेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. जखमी सखाहरी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना त्यांचे कुटुंबीय करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Khandala Fire News: मोठी बातमी! खंडाळा घाटात टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू , 3 जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com