Mumbai-Pune Expressway Traffic Update : मुंबई-पुणे महामार्ग वाहतुकीबाबत पाेलिसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

पाेलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी ट्विट करुन दिली माहिती.
Mumbai-Pune Expressway Traffic Update , oil tanker accident
Mumbai-Pune Expressway Traffic Update , oil tanker accidentsaam tv
Published On

Mumbai-Pune Express Way News : मुंबई - पुणे महामार्गावर आज (मंगळवार) झालेल्या भीषण अपघातामुळे या मार्गावरील विशेषत: मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक तब्बल तीन तासांपेक्षा अधिक खाेळंबली आहे. दरम्यान आग लागलेल्या रासायनिक द्रव्याचा टँकर (oil tanker) संपुर्णत: जळून खाक झाला असला तरी अधून मधून आगीच्या ज्वाळा भडकत असल्याने या मार्गावरील वाहुतक सुरळीत (Mumbai-Pune Expressway Traffic Update) हाेण्यास आणखी एक तास लागेल अशी माहिती वरिष्ठ पाेलिस अधिका-यांनी ट्विट करुन दिली आहे. (Maharashtra News)

Mumbai-Pune Expressway Traffic Update , oil tanker accident
CM Eknath Shinde News : राज्य मंत्रिमंडळ बैठक : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील कुनेगाव येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका रासायनिक टँकरने अपघातानंतर पेट घेतला. त्यानंतर हा टँकर रस्त्यावर पलटला. अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने मोठा स्फोट होऊन टँकरला भीषण आग लागली. परिणामी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पाेलिसांनी थांबवून ठेवली. दुपारी चारवाजेपर्यंत या महामर्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या.

Mumbai-Pune Expressway Traffic Update , oil tanker accident
Ravikant Tupkar News : 'स्वाभिमानी'चा धसका, AIC पिकविमा नरमली..! 16 जूनच्या आंदाेलनावर तुपकरांचे ट्विट

या घटनेची माहिती कळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळावर पाेहचल्या. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आली परंतु त्यानंतर काही वेळाने पुन्हा आगीच्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे फायर ब्रिगेडने पुन्हा आग विझविण्यासाठी पाण्याचा फवारा मारला.

सुरक्षिततेसाठी वाहुतक थांबवली

दरम्यान मुंबई पुणे महामार्गावरील वाहुतक सुरळीत हाेण्यासाठी अद्याप एक तास लागू शक्यताे अशी शक्यता पाेलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी ट्विट करुन दिली आहे. रविंद्र सिंघल यांनी ट्विट करुन आगीची भीषणता लक्षात घेता महामार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली हाेती. अद्यापही आगीची ज्वाळा अधूनमधून येत असल्याने वाहुतक सुरळीत हाेण्यास वेळ लागेल असे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com