CM Eknath Shinde News : राज्य मंत्रिमंडळ बैठक : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

हे सरकार शेतक-यांचे हिताचे कामकाज करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापुर्वीही वेळावेळी बाेलून दाखविले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesaam tv
Published On

maharashtra cabinet meeting decision today : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात बाेगस बियाणे व खतांची विक्री हाेत असल्याच्या घटनांसह तक्रारींचा तपशिल मंत्रालयापर्यंत पाेहचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय आज (मंगळवार) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेस घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी तातडीने पथकाची स्थापना करण्याचे आदेश केले. (Maharashtra News)

CM Eknath Shinde
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

राज्यातील जालना, अकाेला, वर्धा यासह अन्य जिल्ह्यात शेतक-यांना बाेगस बियाणांची विक्री करण्यासाठी, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बाेगस कंपन्यांचे खतांची विक्री करणे असे प्रकार समाेर आले आहेत. काही ठिकाणी शेतक-यांना तिप्पट भावाने बियाण्यांची विक्री केली जात असल्याचा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (swabhimani shetkari sanghatana ravikant tupkar) यांनी देखील केला आहे.

CM Eknath Shinde
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

या सर्व प्रकाराची माहिती थेट मंत्रायलयीन स्तरापर्यंत पाेहचली. या प्रकाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पथके तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यात आता लवकरच जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली हाेणा-या बैठकीत पथकांची स्थापना हाेईल अशी आशा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com