Bihar Politcal News: बिहारमध्ये राजकीय घडमोडींना वेग; नितीश कुमारांना मोठा धक्का, जीतनराम मांझींच्या सुपुत्राने दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Bihar Politcal News In Marathi: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Bihar Politcal News
Bihar Politcal NewsSaam tv
Published On

Bihar News: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे सुपुत्र संतोष सुमन यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)

मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर संतोष सुमन म्हणाले, 'माझी कोणती नाराजी नाही. जनता दल युनायटेडची आमचा 'हिंदुस्तानी अवाम मोर्चा' पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करावा, अशी इच्छा आहे. मात्र, आम्हाला ते मंजूर नाही. आम्ही एकटेच संघर्ष करू. आम्हाला आमचा पक्ष जदयू पक्षात विलीन करायचा नाही. नितीश कुमार सातत्याने पक्ष विलीन करण्यास विनवणी करत आहे. मात्र, आम्ही त्याला नकार दिला आहे'.

Bihar Politcal News
Terrorists Killed : कुपवाडा एलओसीजवळ 2 दहशतवादी ठार, 1 ताब्यात! भारतीय सुरक्षा दलांची मोठी कारवाई

संतोष सुमन पुढे म्हटले की, आम्ही भाजपसोबत जाणार की नाही, ही बाब वेगळी आहे. आम्हाला आमचं अस्तित्व वाचवायचं आहे. मात्र, नितीश कुमार यांना आमचं अस्तित्व नाहीसं करायचं आहे. आम्ही महाविकास आघाडीचे भाग आहोत. आम्ही प्रयत्न करू की, या आघाडीत कायम राहू. परंतु महाविकास आघाडीकडून जागा मिळत नसल्यास, आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू'.

विरोधी पक्षांची बैठक

राजीनाम्यावर भाष्य करताना संतोष सुमन यांनी म्हटलं की, नितीश कुमार यांचा भाजपच्या विरोधात देशातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या उद्देश आहे. त्यांनी २३ जून रोजी पटना येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत राहुल गांधी यांच्यापासून मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, केजरीवाल, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यासहित अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. अशातच संतोष सुमन यांनी राजीनामा दिल्याने नितीश कुमार यांना मोठा बसल्याचे बोलले जात आहे.

Bihar Politcal News
Delhi Earthquake News: दिल्लीसह ४ राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; पाकिस्तान आणि चीनमधील शहरंही हादरली!

जीतनराम मांझी का आहेत नाराज?

दरम्यान, जीतनराम मांझी गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी नाराज आहे. नाराजीचं महत्वाचं कारण म्हणजे, नितीश कुमार यांनी २३ जून रोजी पटना येथे विरोधी पक्षांची मोठी बैठक आयोजित केली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष, जीतनराम मांझी यांना बैठकीचं आमंत्रण दिले नसल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com