Terrorists Killed : कुपवाडा एलओसीजवळ 2 दहशतवादी ठार, 1 ताब्यात! भारतीय सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Jammu Kashmir Terrorists Killed: नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्य आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे दोन दहशतवादी ठार झाले.
Two Terrorists Killed near LoC in Kupwara
Two Terrorists Killed near LoC in Kupwarasaam tv
Published On

Terrorists Killed In Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाड्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्य आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे दोन दहशतवादी ठार झाले. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील डोबनार माचल भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटू शकली नाही. दहशतवाद्यांनी अलीकडेच घुसखोरी केली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Two Terrorists Killed near LoC in Kupwara
Delhi Earthquake News: दिल्लीसह ४ राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; पाकिस्तान आणि चीनमधील शहरंही हादरली!

लष्करशी संबंधीत दहशतवाद्याला अटक दरम्यान बांदीपोरा पोलिसांनी १३ राष्ट्रीय रायफल्स आणि ४५ बीएम सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत बहराबाद हाजीन भागातून लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवादी साथीदाराला अटक केली. त्याच्याकडून दोन चिनी हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी (१३ जून) ही माहिती दिली.

नियंत्रण रेषेपलीकडील लोकांकडून सतत कट

याआधी रविवारी 11 जून रोजी श्रीनगर-स्थित 15 व्या कॉर्प्स किंवा चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेच्या पलीकडे बसलेले लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याने सुरक्षा दलांना सतर्क राहण्याची गरज आहे. नियंत्रण रेषेपलीकडचे लोक सध्याची शांततापूर्ण परिस्थिती बिघडवण्यासाठी कट रचण्यात व्यस्त आहेत. (Breaking News)

Two Terrorists Killed near LoC in Kupwara
Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघातातील 81 जणांचे मृतदेह बेवारस, होणार सामूहिक अंत्यसंस्कार?

गुप्त कारवायांसाठी अल्पवयीनांचा वापर

लेफ्टनंट जनरल औजला यांनी सांगितले की, सध्या गुप्त संदेश, ड्रग्ज किंवा शस्त्रे घेऊन जाणाऱ्यांमध्ये महिला, मुली आणि किशोरवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. आत्तापर्यंत सैन्याने अशी काही प्रकरणं शोधून काढली आहेत. यावरून ही प्रवृत्ती वाढत चालली असल्याचे दिसत आहे. हा अतिशय धोकादायक प्रवृत्ती आहे जी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि तनझिम (दहशतवादी गट) च्या प्रमुखांकडून अवलंबली जात आहेत. त्याचा सामना करण्यासाठी आम्ही इतर एजन्सींसोबत काम करत आहोत, असे देखील ते म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com