Ghodbunder Road Traffic Google
मुंबई/पुणे

Ghodbunder Road Traffic: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास! घोडबंदर रोडवर ३ दिवस नो एन्ट्री, पर्यायी मार्ग कोणते?

Ghodbunder : ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर गायमुख घाटाच्या रस्त्याची दुरुस्ती २६ एप्रिलपासून सुरू होईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी होणार आहे. पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

Dhanshri Shintre

ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर गायमुख घाटाच्या रस्त्याच्या दुरुस्ती करण्यात येणार आहे. या रोडच्या कामासाठी कासारवडवली वाहतूक शाखेने २६ एप्रिल, २०२५ मध्यरात्री ते २९ एप्रिल, २०२५ रोजी मध्यरात्री पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. पण आज सकाळपासून ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवत आहे.

ठाणे-घोडबंदर वाहिनीवर वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे:

ठाणे-घोडबंदर रोडवर वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंद करीत पर्यायी मार्ग सुचविण्यात आलेले आहेत. ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने वाय जंक्शनकडून नाशिक रोडने, खारेगाव, माणकोली, अंजूरफाटा मार्गे इच्छितस्थळी जातील. दुसरा पर्यायी मार्ग वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूरफाटा मार्गे इच्छितस्थळी जातील.

मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जड आणि अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. तर पर्यायी मार्ग मुंब्रा, कळवाकडून घोडबंदरकडे जाणारी वाहने खारेगाव ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे जातील.

घोडबंदर-ठाणे वाहिनीवर वाहतुकीत बदल

गुजरात राज्याकडून घोडबंदर मार्गे मार्गक्रमण करणाऱ्या जड-अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद तर मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरमार्गे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग जड, अवजड वाहने ही चिंचोटी नाका येचुन कामण, अंजुर फाटा, माणकोली भिंवडी मार्गे इन्छित स्थळी जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT