Dhanshri Shintre
मुंबई ही आपल्या राज्याची राजधानी असून ती देशाच्या आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, उद्योगांचे केंद्र मानले जाते.
मुंबईतील ‘विले पार्ले’ हे उपनगर आपल्या खास इतिहास आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते, अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे.
'विले पार्ले' हे नाव ऐकून अनेकांना वाटते की ते एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून ठेवले गेले आहे.
शेकडो वर्षांपूर्वी या परिसरात अनेक लहान वस्त्या होत्या. ‘विले’ म्हणजे छोटे गाव किंवा वस्त्यांचा समूह मानला जातो.
'पार्ले' हा शब्द पोर्तुगीज भाषेतील ‘पावडे’ या शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ वस्ती किंवा वसाहत असा होतो.
कालांतराने ‘पावडे’चा अपभ्रंश होऊन ‘पार्ले’ हा शब्द रूढ झाला आणि परिसराची ओळख ‘विलेपार्ले’ म्हणून झाली.
काहींच्या मते, विलेपार्ले हे नाव पोर्तुगीज शब्द ‘वेहला’पासून आले असून त्याचा अर्थ ‘जुना गाव’ असा आहे.
पार्ले-जी बिस्किट कंपनीने आपल्या उत्पादनाला ‘विलेपार्ले’ या उपनगराच्या नावावरूनच हे प्रसिद्ध नाव दिलं आहे.विले पार्लेतील बंद कारखाना
1929 मध्ये मोहनलाल दयाळ यांनी विले पार्लेतील बंद कारखान्यात ‘पार्ले-जी’ बिस्किट कंपनीची सुरुवात केली होती.