Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेची आजची सुनावणी संपली, आज नेमकं काय झालं?

Political News : या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर

Mumbai News :

आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी आज विधानसभेत पार पडली.  शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी दोन्ही बाजूने आपला युक्तिवाद केला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याची मागणी, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे.

शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्र नको, वेगवेगळी सुनावणी घ्या, असा युक्तिवाद यावेळी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सगळ्या याचिका एकत्रित चालवाव्या या शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीवर अॅड देवदत्त कामत, असिम सरोदे, रोहित शर्मा यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर एकनाथ शिंदे गटातर्फे अॅड. अनिलसिंग यांनी प्रचंड विरोध केला.

प्रत्येक याचिका स्वतंत्र चालवावी आणि आम्हाला आवश्यक वाटेल तर नैसर्गिक न्याय तत्वानुसार पुरावा घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली. (Latest Marathi News)

सुनावणीचे वेळापत्रक देण्यात येणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सगळ्या वकिलांना सुचवणार आणि त्यावर सगळ्यांची मते घेणार आहेत. सर्व वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचे वेळापत्रक देण्यात येणार आहे. सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार, असे अध्यक्षांनी म्हणताच ठाकरे गटातर्फे यावर आक्षेप घेण्यात आला. असं आधी कधीच झालं नाही, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं. (Political News)

निकाल यावर्षी लागणे कठीण

आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल यावर्षी लागणे कठीण आहे. कारण या प्रकरणात ठाकरे गटाच्या 22 तर शिंदे गटाच्या 12 अशा एकूण 34 याचिका आहेत. सर्व याचिकांवर स्वतंत्र युक्तिवाद होणार आहे. संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे व उलट तपासणी यांचा समावेश आहे. संबंधित प्रकियेला किमान ३ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने सुनावणीची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT