MLA Disqualification Case: मोठी बातमी! अपात्रतेचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी, सामला सूत्रांची माहिती

Shiv Sena News: मोठी बातमी! अपात्रतेचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी, सामला सूत्रांची माहिती
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSaam Tv
Published On

>> सुरज मसुरकर

Shiv Sena MLAs disqualification Case:

एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा हे प्रकरण लांबणीवर गेलं आहे. याचे राजकीय पडसाद देखील कशा पद्धतीने उमटतात शकतात हे पाहणं महत्वाचं आहे. ठाकरे गटाकडून वारंवार सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र आता याप्रकरणी निकाल याच वर्षी लागणं कठीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

MLA Disqualification Case
2000 Note Exchange : 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरच्या आधी बदलली नाही तर काय होणार? वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अपात्रता प्रकरणी संभाव्य वेळापत्रकात कागद पत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे व उलट तपासणीचा समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणाची एकूण ३४ याचिका अहेत. कागद पत्रे तपासणीचा समावेश करण्यात आल्याने या प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. त्यासाठी तीन महिन्यांहून अधिक वेळ लागू शकतो. (Latest Marathi News)

यातच डिसेंबरमध्ये हिवाळी असणार आहे. त्यावेळी याप्रकरणी सुनावणी होऊ शकते आणि या निकाल लागू शकतो. मात्र कागद पत्रे तपासणीचा समावेश करण्यात आल्याने यात लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यातच सुनावणीला तीन महिन्याचा वेळ लागला तर याचा निकाल यायला नवीन वर्ष उजाडावं लागणार आहे. (Political News)

MLA Disqualification Case
Prakash Ambedkar:...तर आमचे दरवाजे खुले, प्रकाश आंबेडकरांचा INDIA आघाडीसमोर प्रस्ताव

दरम्यान, आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी आज विधानसभेत पार पडली. यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याची मागणी, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com