Titwala News Saam tv
मुंबई/पुणे

Titwala : टिटवाळ्यात टोळक्यांकडून घरावर हल्ला, संपूर्ण कुटुंबाला लोखंडी हत्याराने बेदम मारहाण

Titwala News : टिटवाळा परिसरात शुल्लक कारणांवरुन काही जणांनी एका कुटुंबावर हल्ला करून घराची तोडफोड केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • टिटवाळ्यात गाडी हळू चालव सांगितल्यावरून वाद झाला

  • संतप्त टोळीने कुटुंबावर हल्ला करून घराची तोडफोड केली

  • या हल्ल्यात तीन जण जखमी झाले

  • टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात शुल्लक कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालव सांगितल्याच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड केली आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा आंबेडकर चौक परिसरातील आर.के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. ५० वर्षीय तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. ३ मार्च रोजी ते आपल्या भावांसह घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल वेगात चालवत परिसरातून जात होता.

त्यावेळी त्यांनी त्याला इथून गाडी हळू चालव असे सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित तरुण काही वेळातच आपल्या वडिलांसह आणि इतर साथीदारांना घेऊन घटनास्थळी परतला. त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने घराची तोडफोड करत तक्रारदाराच्या डोक्यात मारहाण केली तसेच तोंडावर मारल्याने दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार देण्यात आली असून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT