Masked gang vandalizes house in Titwala; women assaulted, minor narrowly escapes abuse attempt saam tv
मुंबई/पुणे

चाळ माफियांचा हैदोस! १२ गुंड तोंडाला रुमाल बांधून आले, लाठ्याकाठ्यांनी महिलांना अमानुष मारहाण, अत्याचाराचा प्रयत्न

Titwala Slum Mafia Attack Women Assault Extortion Case: टिटवाळ्यात चाळ माफियांचा धक्कादायक हैदोस पुन्हा समोर आला आहे. १०-१२ गुंडांनी घरात घुसून तोडफोड, महिलांना मारहाण केली आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्नही केला.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण जवळील टिटवाळ्यामध्ये चाळ माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला असून, हफ्ता दिला नाही म्हणून एका वयोवृद्ध महिलेच्या घरावर १० ते १२ गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिटवाळ्याच्या सदगुरू चाळीत अचानक आलेल्या एका बसमधून रुमालाने तोंड बांधलेले गुंड हातात हातोडे, लाठ्या-काठ्या घेऊन उतरले आणि त्यांनी एका घराची अक्षरशः तोडफोड केली.

एवढ्याचवर न थांबता, या नराधमांनी घरात घुसून महिलांना बेदम मारहाण केली आणि एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण टिटवाळा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळी बांधून गोरगरीब जनतेला विकायच्या आणि नंतर त्याच रूमच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपयांची खंडणी उकळायची, असा नवा गोरखधंदा या चाळ माफियांनी सुरू केला आहे. सद्गुरु चाळीत राहणाऱ्या रमा कदम यांनी चाळ माफिया किरण राजन गुजरे याच्याकडून एक रूम विकत घेतली होती. घर जुने झाल्याने कदम यांनी घराच्या दुरुस्तीचे काम काढले असता, मुख्य आरोपी किरण गुजरे याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

रमा कदम यांनी पैसे देण्यास नकार देताच, किरण गुजरे याने आपल्या १० ते १२ गुंडांना बोलावून कदम यांच्या घरावर हल्ला केला. हातोड्याने घर फोडण्यात आले, घरातील महिलांचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला . गोरगरिबांवर अशा प्रकारे दहशत माजवून पैसे उकळणाऱ्या या चाळ माफियांच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार? आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Hydration: सकाळी उठताच प्या फक्त 1 ग्लास पाणी; शरीरात होतील हे 5 चांगले बदल

Weight loss: पोटाची चरबी झटक्यात वितळवतील या छोट्या बिया; कसं कराल सेवन

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेत प्रवेशासाठी नवी नियमावली लागू

Mumbai Local Megablock: रेल्वे प्रवाशांचे रविवारी होणार हाल; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT