Titwala Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Titwala Crime News: गटारी अमावस्या निमित्त टिटवाळ्याजवळील रायते येथील आदित्य फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत गाणं लावण्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Bhagyashree Kamble

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही

गटारी अमावस्यानिमित्त टिटवाळ्याजवळील रायते येथील आदित्य फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत गाणं लावण्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. उल्हासनगरातील शिवसेना (शिंदे गट) युवासेनेचा पदाधिकारी विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव या युवकावर हातोडा, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.

या घटनेत करण जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनी भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मणि अण्णा, रमु आणि डॅनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

गटारी अमावस्येच्यानिमित्त करण जाधव आपल्या मित्रांसह आदित्य फार्महाऊसवर पार्टीसाठी गेला होता. रात्रीच्या सुमारास गाणं लावण्यावरून करण आणि दुसऱ्या गटात वाद झाला. वाद बघून फार्महाऊस मालकाने दोन्ही गटांना बाहेर जाण्यास सांगितले. याच दरम्यान उल्हासनगरातील शिंदे गटाचा युवा सेना पदाधिकारी विकी भुल्लर आपल्या साथिदारांसह फार्महाऊसवर दाखल झाला.

विकी भुल्लर आणि करण जाधव यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर विकी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करणवर हॉकी स्टिक, लाकडी दांडे आणि हातोड्याने जबर हल्ला चढवला. या मारहाणीत करण जाधव गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गुन्हा दाखल पण आरोपी फरार

या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असला तरी, घटनेनंतर 48 तास उलटून गेले तरीही एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

जखमी करण जाधवने पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : गरबा खेळताना थकवा येणार नाही; फक्त 'या' ५ गोष्टी करा, एकदम फ्रेश वाटेल

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

Arjun Tendulkar : साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीत मोठा बदल; अवघ्या ३ चेंडूत द्रविडला दाखवला पव्हेलियनचा रस्ता

Donald Trump : हनुमान खोटा देव, आपण ख्रिश्चन आहोत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

तुमच्या बँकेकडून ऑनलाईन चेकबुक कसं ऑर्डर करायचं?

SCROLL FOR NEXT