Jejuri Warkari Accident  
मुंबई/पुणे

Pune : जेजुरीत दिंडीतील ३ वारकरी महिलांचा मृत्यू, वारकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Jejuri Warkari Accident : जेजुरीमध्ये आषाढी वारीतील दिंडीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर वारकरी सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाच्या व्यवस्थेवर टीका होत आहे.

Namdeo Kumbhar

रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी जात असतात. पांडुरंगाच्या नामस्मरणात मार्गस्थ होत असतानाच खंडेरायाच्या जेजुरीत वारकऱ्यांवर काळानं घाला घातला.,. नेमकं काय झालं? किती वारकऱ्यांना जीव गमवावा लागला? या दुर्घटनेला कोण जबाबदार? पाहूया यावरचा एक रिपोर्ट...

आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. ग्यानबा-तुकाराम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले आहेत. मात्र जेजुरीत रंगनाथ महाराज पोखरबिशीकरांच्या दिंडीतल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातलाय. मागून आलेल्या भरधाव ट्रकनं मागून वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. यात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिला वारकऱ्यांनी अपघाताचा थरारक अनुभव सांगितलाय.

अपघातातील जखमी वारकऱ्यांवर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलीये..

अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केलीये. तर दुसरीकडे, वारकऱ्यांच्या मृत्यूनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तर काँग्रेसनं सरकारच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप केलाय.

या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केलीये. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या विविध ठिकाणांहून आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. या पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी चालत असतात. अशावेळी शासनाकडून लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था उभी करण्यात येते. मात्र, जेजुरीतील अपघातामुळे सरकारच्या व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दिंडींच्या मार्गावर अवजड वाहनांवर बंदी असते. मग हा ट्रक नेमका आला कुठून? या मार्गावर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नव्हता का? वाहतूक शाखेचे पोलीस काय करत होते? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची डीग्री सार्वजनिक करावी; अभिजीत दिपके असं का म्हणाले? VIDEO

Fake Currency : भरधाव कार थांबवली अन पोलिसांचे डोळेच पांढरे झाले! बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश

केस गळती कमी करण्यासाठी सोपे 5 उपाय

SCROLL FOR NEXT