Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

Pune Crime News: पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता झाली. ही तरुणी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. तिने ईमेल करत पळून जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता
Pune Crime NewsSaam Tv
Published On: 
  • पुण्यात २२ वर्षीय कॉलेजची तरुणी बेपत्ता

  • कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत आलीच नाही

  • बॉयफ्रेंडसोबत पळून जात असल्याचे तिने सांगितले

  • तरुणीने कुटुंबीयांना ईमेल करत दिली माहिती

  • फुरसुंगी पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली. ही तरुणी कॉलेजला जाते सांगून घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही. बेपत्ता झालेल्या तरुणीच्या शोध घेताना आई, भाऊ आणि लहान बहिणीला ई-मेल आला. तिने कुटुंबीयांना ईमेल करत बॉयफ्रेंडसोबत पळून जात असल्याचे सांगितले.

बॉयफ्रेंडला एड्स असल्याचे माहिती असून सुद्धा मी त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे तिने ईमेलमध्ये लिहिले आहे. तरुणीने घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणारी २२ वर्षीय तरुणी खासगी कॉलेजमध्ये बीएसस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी ती कॉलेजला गेली, मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांकडे त्यांनी विचारणा केली. इतकचं नाही तर कुटुंबियांनी आजूबाजूचा सुद्धा परिसर शोधला. मात्र ती कुठे ही दिसून आली नाही.

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता
Pune Crime: रांजणगावात पुन्हा रक्तरंजित हल्ला; कोयता, दगड अन् फायटरने तरुणांना बेदम मारहाण

यावेळी बेपत्ता झालेल्या तरुणीने तिच्या आई, भाऊ आणि बहिणीला ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये तिने आपण एका तरुणासोबत पळून जात असल्याचे स्पष्ट लिहिले. 'मी एका तरुणासोबत पळून चालले असून, त्याला एड्स असल्याचे माहीत असूनही मी त्याच्याशीच लग्न करणार आहे.', अशा आशयाचा ई-मेल तिनं तिच्या कुटुंबियांना पाठवला. हा ई-मेल येताच कुटुंबीयांच्या चिंतेत आणखी भर पडली.

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता
Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

मुलगी नेमकी कुठे आहे आणि संबंधित तरुण कोण आहे? असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसमोर उभे राहिले. मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिच्याबाबत कोणतीही ठोस माहिती कुटुंबियांना मिळाली नाही. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी थेट फुरसुंगी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस या तरुणीचा शोध घेत आहेत.

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com