Shreya Maskar
ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर उष्णता आणि आर्द्रता वाढते. शरीरातून घामाच्या रूपाने पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. याचा थेट परिणाम किडनीच्या कामावर होतो, यामुळे शरीरावर ताण येतो आणि किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
उष्ण वातावरणात जास्त घाम येतो. पुरेसे द्रव न घेतल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते आणि किडनीपर्यंत रक्तप्रवाह कमी होतो. गंभीर डिहायड्रेशनमुळे किडनीला नुकसान होण्याची शक्यता असते.
पाणी कमी प्यायल्याने लघवीचे प्रमाण कमी आणि ती अधिक केंद्रित (concentrated) होते. त्यामुळे लघवीतील काही खनिजे व क्षार एकत्र येऊन क्रिस्टल्स तयार होण्याची शक्यता वाढते आणि काही लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
अत्यधिक उष्णता आणि डिहायड्रेशन एकत्र आल्यास AKI होऊ शकतो. यात काही तासांपासून काही दिवसांत किडनीची कार्यक्षमता अचानक कमी होऊ शकते.
लघवीचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी होणे, लघवी खूप गडद पिवळी होणे, सतत तहान लागणे, अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ किंवा उलटी, स्नायूंमध्ये आकडी आणि कंबरेत तीव्र वेदना ही किडनीच्या आजाराची धोक्याची लक्षणे आहेत.
तहान लागण्याची वाट न पाहता वेळोवेळी पाणी प्या. बाहेर उन्हात काम असल्यास मध्ये मध्ये सावलीत/थंड ठिकाणी विश्रांती घ्या. लघवीचा रंग आणि प्रमाणाकडे लक्ष द्या.खूप घाम येत असल्यास भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा.
तुम्हाला जर आधीपासून किडनीचा आजार असतील तर शरीराला हायड्रेट ठेवा. लघवीला वारंवार जात रहा. किडनीवर कोणत्याहा प्रकारे ताण येणार नाही, याची काळजी घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.