>> अभिजीत देशमुख
Doctors Village: आजपर्यंत सैनिकांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव, अशी ओळख महाराष्ट्रात अनेक गावांनी निर्माण केली आहे. कल्याण ग्रामीण भागातील घारीवली गावाने 'डॉकटरांचे गाव', अशी ओळख निर्माण केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील घारिवली गावात २० जण डॉकटर झाले आहेत. त्यामुळे या गावाने डॉक्टरांचे गाव, अशी ओळख निर्माण केली असून या ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर डॉक्टरांचं गाव घारिवली, असा फलक लावलाय.
कल्याण ग्रामीण भागातील कल्याण शीळ रोड वरील घारीवली गावात २५ ते ३० घरे आहेत. गावातील बहुतांश कुटुंब शेती व इतर व्यवसाय करत उपजीविका भागवितात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला - मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले आहे. (Latest Marathi News)
मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली. या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून डॉकटर झाले आहेत. तर आणखी पाच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या गावाची डॉक्टरांचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांचे नाव लिहून डॉक्टरांचे गाव असा फलक लावलाय.
डॉक्टरांनी आता आपल्या गावातील तसेच आसपासच्या गावातील लोकांची सेवा करावी राज्याचं आणि देशाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.