Solapur News: भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा जन्म कसा झाला, शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा...

Sharad Pawar News: भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा जन्म कसा झाला, शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा...
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Sharad Pawar News: ''विधिमंडळात गणपतराव देशमुख यांनी आगळ्यावेगळ्या काम करून दाखवले आहे. एक काळ महाराष्ट्रात असा होता, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 49 या कालखंडात काँग्रेस पक्षात मतभेद झालेत. काँग्रेसचे नीती शेतकऱ्यांच्या हिताची नाही, अशी भावना झाली. त्यामुळे अनेक नेत्यांनी एकत्र बसून काँग्रेसच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारी एक विचारधारा करण्यात विचार पुढे आला. त्यातून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा नाशिक येथे जन्म झाला'', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

आज सांगोल्यातील दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचा अनावरणचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना पवार यांनी हा किस्सा सांगितला आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics: शिवसेनाप्रमुख अहंकारी नव्हते,पण आदित्य-उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार भरलाय; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

शरद पवार यांनी सांगितलं की, ''त्यावेळी अनेक नेत्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडली. या नेत्यांच्या मालिकेत गणपतराव देशमुख यांचे नाव हे कटाक्षाने घ्यावे लागेल. मी काँग्रेसच्या विचाराचा होतो, पण माझं संपूर्ण घर हे शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचं होतं.''  (Latest Marathi News)

शरद पवार पुढे म्हणाले की, ''संपूर्ण देशात स्वच्छ काम करणारी सूतगिरणी ही सांगोल्याची गणपतराव देशमुख यांची आहे. साखर कारखाना कसा चालवायचा हा आदर्श ही गणपतराव देशमुख आणि दाखवलाय. गोरगरिबांसाठी शैक्षणिक संस्था उभं करण्यात त्यांचे योगदान हे मोठं आहे. शेतकरी कामगार आणि दुष्काळ भागातील नागरिकांसाठी गणपतराव देशमुख आणि फार मोठा काम केलेला आहे. दुष्काळी परिस्थिती अखंडपणे कायमपणे सोडवणुकीसाठी गणपतरावांनी खूप मोठा काम केलेलं आहे.''

Sharad Pawar
Jitendra Awhad On Kalwa Hospital: 'या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा नाही', जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; मनसेही आक्रमक

याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''आबासाहेबांच्या भाषणातून दिशा मिळायची. आबासाहेब देशमुखांचे भाषण सदस्य कान लावून ऐकायचे. कष्टकरी, गरीबांची व्यथा आबासाहेब देशमुख सभागृहात मांडायचे. आबासाहेबांनी कधीही सुटी घेतली नाही. आबासाहेब हे वनमॅन आर्मी होते. विरोधी पक्षात असताना प्रश्नाची सोडवणूक करताना योग्य प्रकारे भूमिका मांडायचे. विधानमंडळाची उंची आबासाहेबांसारख्या लोकांमुळे आहे. आबासाहेबांच काम प्रेरणा देणारं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com