Jitendra Awhad On Kalwa Hospital: 'या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा नाही', जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; मनसेही आक्रमक

Kalwa Hospital News: मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Leader Avinash Jadhav) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना जाब विचारला.
Jitendra Awhad On Kalwa Hospital
Jitendra Awhad On Kalwa HospitalSaam Tv
Published On

Thane News: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एकाच रात्रीमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी रुग्णालया बाहेर मोठी गर्दी केली आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Leader Avinash Jadhav) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना जाब विचारला. तसंच मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad On Kalwa Hospital
Kalwa Hospital News: धक्कादायक! ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, 'परवा रात्री रुग्णांचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर सुद्दा मी आलो होतो. शेवटी प्रशासनाची चावी कोणाच्या हातात आहे. या रुग्णालयातील प्रशासन बेशिस्त आहे.' तसंच, 'या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग आहे. बाहेर जाण्याचा मार्ग नाही. या प्रकरणी सरकारचे डोळे कधी उघडणार?', असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

Jitendra Awhad On Kalwa Hospital
Shivsena News : ...तर शिंदे गट कमळ चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार, शिवसेना आमदाराने स्पष्ट सांगितलं

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील हॉस्पिटलमध्ये धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरले आहे. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच रुग्ण दगावत असतील तर आम्हाला अशा मुख्यमंत्र्यांची गरज नाही. रुग्ण दगावल्यानंतर आम्ही आंदोलन केलं होतं. तेव्हा मनसेकडून आम्हाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण सरकारने तेव्हाच आमचं म्हणणं ऐकलं असतं तर आज एवढे रुग्ण दगावले नसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी नाकर्त्यांना काढून टाकलं पाहिजे. नाही तर रुग्णालयात मृतांचे तांडव वाढत जाईल.'

Jitendra Awhad On Kalwa Hospital
Vasant More News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सने लॅम्बोर्गिनी कारखाली श्वासना चिरडलं! वसंत मोरे संतापले; 'मोठ्या बापाच्या औलादीने...'

तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापूर्वी देखील एकाच दिवशी जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.'

तसंच, 'डॉक्टरांची अपुरी संख्या, अपुरी सामुग्री आदी कारणांमुळे या घटना घडत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. याकडे मुख्यमंत्री, ठाणे महापालिका आणि आरोग्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष देऊन सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.', असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com