Shivsena News : ...तर शिंदे गट कमळ चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार, शिवसेना आमदाराने स्पष्ट सांगितलं

Political News : पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांनाच आहे, असंही किशोर पाटील यांनी म्हटलं.
eknath shinde
eknath shinde saam tv
Published On

Mumbai News : शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील कायदेशीर पेच अद्याप कायम आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असलं तरी हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरणही विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीला आहे. त्यामुळे शिंदे गटाचं येणाऱ्या काळातील राजकारण या दोन्ही निकालांवर अवलंबून असेल.

भविष्यात काही तांत्रिक अडचण आलीच आणि आमचे नेते, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला मान्य असेल, असं शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे. 'सरकारनामा'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं याहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.  (Political News)

eknath shinde
Mahamandal Vatap News : महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार

आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं की, शिंदे गटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अडचण आमच्या आमदारांना येणार नाही. पुढची निवडणूक आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढू. (Latest Marathi News)

तरीही काही तांत्रिक अडचण आलीच तर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला तो मान्य असेल. पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांनाच आहे, असंही किशोर पाटील यांनी म्हटलं. (Maharashtra News)

eknath shinde
Pune Collages News : पुण्यातील महाविद्यालयांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं कारण काय?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विधानसभा अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाच्या काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात. मात्र या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी आणि पुढील अपात्रताही वाचू शकते. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com