Mahamandal Vatap News : महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार

Political News : महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये 60-20-20 चा फॉर्म्युला, असावा अशी मागणी भाजपने केली होती.
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News Saam TV
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News : अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीनंतर सर्वच गणित बदललं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महामंडळाच्या वाटपातही काही बदल दिसण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या वाटपासाठी 50-25-25 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये 60-20-20 चा फॉर्म्युला, असावा अशी मागणी भाजपने केली होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने 50 25 आणि 25 असा आग्रह धरला. यानुसास भाजप 50, शिवसेना 25 आणि राष्ट्रवादी 25 असा असा आग्रह धरला. शिवसेना-राष्ट्रवादीच्या या मागणीला आता मान्यता मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Cabinet expansion News
Sharad Pawar-Devendra Fadnavis News : अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीनंतर शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; काय आहे कार्यक्रम?

विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती, आश्वासन समिती यासह एकूण 25 समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांवरील आमदारांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सादर करणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळाली आहे. (Political News)

येणाऱ्या काळात आणखी काही महामंडळाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या नेत्यांना महामंडळांवर संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अजित पवारांच्या येण्याने भाजप-शिवसेनेतील अनेकांचा हिरमोड होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com