Sharad Pawar-Devendra Fadnavis News : अजित पवारांसोबतच्या गुप्त भेटीनंतर शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; काय आहे कार्यक्रम?

Political News : शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार असून सकाळी ११ वाजता एका आयटी पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील.
Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar on Devendra FadnavisSaam Tv
Published On

अक्षय बडवे

Pune News : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल गुप्तभेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचं नेमकं कारण काय याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. या चर्चा सुरु असताना असा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आज एकत्र येणार आहेत.

आज शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार असून सकाळी ११ वाजता एका आयटी पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. दुपारी संगोल्यामध्ये गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडेल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पवार यांच्या सोलापूर दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Political News : भाजपची 'एक्सपायरी डेट' 2024 पर्यंत, सामनातून घणाघात; PM मोदी-शाहांवरही टीकास्त्र

भेट कुठे झाली?

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर भेट झाली. या बैठकीला जयंत पाटील, हे देखील उपस्थित होते. अजित पवारांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडले. मात्र शरद पवार यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावले, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; काँग्रेस-ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले...

महाविकास आघाडीतील नेते काय म्हणाले?

काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही.'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला काहीही करून भाजप समर्थनासाठी तयार करा, असा निरोप पाठवला असावा, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. (Political News)

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अशा भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असतं. याबाबतची स्पष्टता आहे, ती समोर आली पाहिजे. अशा गोष्टींमुळे संभ्रम निर्माण झाला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com