Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; काँग्रेस-ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले...

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet: शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; काँग्रेस-ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले...
Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar MeetSaam Tv

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet: पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर झाली होती. या बैठकीला जयंत पाटील, हे देखील उपस्थित होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

सूत्रांनी सांगितलं की, अजित पवारांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडले. मात्र शरद पवार यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावले. या नेत्यांच्या भेटीनंतर आता महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ५० हजार कोटींचे पूल उभारणार: नितीन गडकरी

याच भेटीवर बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही.'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला काहीही करून भाजप समर्थनासाठी तयार करा, असा निरोप पाठवला असावा, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे अथवा अजित पवार यांना सामील करून देखील भाजपची घसरण सुरूच असल्याने भाजपने जनाधार असलेल्या नेत्यांना चूचकारणे सुरू केल्याचे मत वडेट्टीवार यांनी मांडले. संसदेत व बाहेरही शरद पवार यांनी घेतलेली भाजप विरोधाची स्पष्ट भूमिका बघता भाजपला कठीण दिवस असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
Latest International News Today: पॅरीसमधील जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर' बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस हाय अलर्टवर

तसेच यावर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अशा भेटीमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असतं. याबाबतची स्पष्टता आहे, ती समोर आली पाहिजे. अशा गोष्टींमुळे संभ्रम निर्माण झाला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com