Vasant More News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सने लॅम्बोर्गिनी कारखाली श्वासना चिरडलं! वसंत मोरे संतापले; 'मोठ्या बापाच्या औलादीने...'

Pune Accident News: या प्रकरणात सोशल मीडिया एन्फुएन्सर प्रसार नगरकर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Vasant More News
Vasant More NewsSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Accident News: पुण्यामधील फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लॅम्बोर्गिनी मोटारीने एका भटक्या श्वानाला धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात घडली होती. सोमवार (७, ऑगस्ट) फसीरोडवरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात ही अपघाताची घटना समोर आली होती. या संदर्भात भगधाव वेगात गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हाही नोंद झाला होता. या प्रकरणात आता मनसे नेते वसंत मोरे यांनी उडी घेत मृत श्वानाची श्रद्धांजली सभाआयोजित केली आहे.

Vasant More News
Nashik News: धोंड्याच्या महिन्याचा हटके सोहळा! ६ बैलगाड्या, अन् टाळ मृंदुंगाचा गजर; लेक आणि जावयाची निघाली जंगी मिरवणूक

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) गुडलक चौकात भरधाव गाडीने धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाला होता. या घटनेची मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी गंभीर दखल घेतली आहे. फेसबूक पोस्ट करत त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून त्या तरुणाला धडा शिकवणार असल्याचेही म्हणले आहे.

वसंत मोरेंची पोस्ट..

त्याचं झालं असं 5 ऑगस्ट ला दु. 2 वाजता पुण्यातील गुडलक चौकात डॉन रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे झोपला होता. आणि अचानक पुण्यातील एका नामांकित सोन्याच्या दुकानाच्या मालकाच्या जहागीरदार पोराची 4 कोटी रुपयांची लिंबोर्गीनी गाडी आली.

"ह्या मोठ्या बापाच्या लेकाने त्याला त्याच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली घेतला थोडा थांबला असता तर कदाचित डॉन वाचला ही असता पण या मोठ्या बापाच्या औलादीने गाडी तशीच पुढे रेटली आणि डॉन चा जीव घेतला.." अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याला धडा शिकवणारचं असेही ते म्हणाले आहेत.

Vasant More News
Kalwa Hospital News: धक्कादायक! ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

दरम्यान, या प्रकरणात कारचालक इन्फ्लुएन्सर तरुण प्रसार नगरकर (Prasad Nagarkar) विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. "आम्ही शनिवारी सीसीटीव्ही फुटेज तसेच एफआयआरमध्ये नमूद केलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे त्याला अटक केली. आम्ही त्याची कारही ताब्यात घेतली आहे. नंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com