...म्हणून 'एकांतवासात' गेले होते खासदार डॉ. अमोल कोल्हे
...म्हणून 'एकांतवासात' गेले होते खासदार डॉ. अमोल कोल्हे Saam Tv
मुंबई/पुणे

...म्हणून 'एकांतवासात' गेले होते खासदार डॉ. अमोल कोल्हे

साम टिव्ही

प्राची कुलकर्णी, पुणे

पुणे: शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ७ नोव्हेंबरला फेसबुकवर एक पोस्ट लिहत आपण काही दिवस एकांतवासात (seclusion) जातोय अशी माहिती दिली होती. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. अखेर एकांतवासातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत साम टिव्हीला (MP Amol Kolhe SaamTv Interview) दिली आणि एकांतवासात जाण्याचं खरं कारण सांगितलं. (... that's why MP Dr. amol kolhe was gone into 'seclusion'.)

हे देखील पहा -

डॉ. कोल्हे म्हणाले की, गेले काही दिवस, गेले काही वर्ष सतत कलाक्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेमकं आपण कुठपर्यंत पल्ला गाठलाय किंवा कुठपर्यंत पल्ला गाठायचा आहे? विशेषतः कोविडच्या काळात दोन लाटा येऊन गेल्यानंतर दीड वर्षांमध्ये आपण जी सुरुवात केली होती किंवा जे गोल्स आपण सेट केले होते ते गोल्स रिअसेट्स करण्याची गरज आहे का? किंवा त्यात काही बदल करण्याची गरज होती का यासाठी हा एकांतवास होता असं डॉ. कोल्हे म्हणाले. यात राजकीय काहीही नव्हतं. पण एक फटीक आल्यासारखं वाटत असेल मानसिक थकवा (Stress) आला असेल तर याकडे सजग दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

काही होण्याची गरज नसते, शाळेत असताना अभ्यास करताना आपण उजळणी करुन पाहतो, त्यासाठी शिक्षकांनी शिक्षा करण्याची गरज नसते, आपणच आपली उजळणी एकदा करुन पाहण्यात काही गैर नाही असं डॉ. कोल्हे म्हणाले. कोविडच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात स्थित्यंतर झालं. या आठ दिवसांनी खरं पाहिलं तर अंतर्मुख होऊन स्वतःकडे पहायला वेळ मिळाला हा फार गरजेचा होता. ज्यासाठी ब्रेक घेतला, चिंतन (Contemplation) केलं ते येणाऱ्या काळात पहायला मिळेल असंही ते म्हणाले.

हा ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी एक गोष्ट अधोरेखीत झाली. ३०-३५ वर्षातील तरुणांना खरंच ही समस्या भेडसावत आहे. कुणीतरी यावर बोललं पाहिजे. आज जर तुम्ही आकडेवारी बघितली तर, भारताच्या लोकसंख्येच्या ४.१६% टक्के लोकांना आपात्कालीन वैद्यकीय खर्चांना सामोरे जावे लागते. यात असंसर्गजन्य रोग जसे उच्च रत्तदाब, मधुमेह, दमा, बरेचसे आजार हे मानसिक तणावासंदर्भात आहे. मग या मानसिक आरोग्य (Mental Health) आणि आजार यावर कुणीतरी बोलायला हवं असंही डॉ. कोल्हे साम टिव्हीच्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasvee Ghosalkar News | तेजस्वी घोसाळकरांचा निवडणूक लढण्यास नकार, काँग्रेसचा उमेदवार कोण?

T20 World Cup 2024: वर्ल्डकपआधी पाकिस्तान संघात मोठा बदल! टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाचा संघात समावेश

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक

Most Expensive Mango: जगातील सर्वात महाग आंबा कोणता?

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ कसा टिकणार? वाचा टिप्स

SCROLL FOR NEXT