Thane Water Supply google
मुंबई/पुणे

Thane Water Supply: ठाण्यात पाणीकपातीचं संकट! 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा यादी...

Thane Water Cut May 2026: ठाण्यातल्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे. पुढील बातमीत या भागांची नावे आणि तारीख देण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आता उन्हाच्या वाढत्या तापमानासोबत नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे ठाणे करांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन देण्यात आले आहे.

ठाण्यात कोणत्या दिवशी पाणीपुरवठा बंद?

ठाण्यातील काही भागांमध्ये येत्या २१ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते २२ मे २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे, एमआयडीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय परिसरात बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक १,२ आणि ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि काही दुरुस्तीची कामे करण्यात येतील.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

पाणीपुरवठा बंद झाल्याचा परिणाम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे परिसरातल्या काही भागांवर परिणाम होणार आहे. दिवा आणि कळवा प्रभाग समितीतल सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मुंब्रा परिसरात प्रभाग क्र. २६ आटणि ३१ मधील काही भाग वगळता इतर बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत राहील.

वागळे प्रभाग समितीअंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरूनगर या भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. तर मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव परिसरातही 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

अधिकाऱ्यांच्या बैठकीतला निर्णय

23 एप्रिल 2026 रोजी जलसंपदा विभाग आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आंध्रा आणि बारवी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यातील तूट तसेच आगामी काळात कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालीसाठी काही तातडीची कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल; अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर,उज्ज्वला लाभार्थ्यांना झटका

SCROLL FOR NEXT