Sakshi Sunil Jadhav
पोट साफ न होणे ही आजकालची सामान्य समस्या झाली आहे. चुकीची जीवनशैली, कमी हालचाल आणि चुकीचा आहार यामुळे ही समस्या वाढते.
काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो करुन तुम्ही यावर आराम मिळवू शकता.
रोजच्या रोज चाला किंवा हलका व्यायाम करा. त्याने पचनसंस्था अॅक्टीव्ह राहते आणि पोट साफ होतं.
बसून राहण्याची सवय टाळा. दिवसभरात लहान-मोठी हालचाल वाढवल्यास कब्ज कमी होतो.
फळं, भाज्या, संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करत राहा. फायबरमुळे पोटातली घाण सहज बाहेर पडते.
दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचे आहे. पाण्यामुळे पचन सुधारतं.
दररोज न चुकता 15 मिनिटं योगा केल्याने मोठा फायदा होतो. त्यामध्ये तुम्ही वज्रासन, भुजंगासन, हलासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन अशा प्रकारची योगासनं करु शकता.
तणावामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. त्यामुळे ध्यान, योग आणि रिलॅक्सेशन करण्याचा प्रयत्न करा.
काही प्रेशर पॉइंट्सवर हलका मसाज केल्याने आंतांची हालचाल सुधारते.
जास्त दिवसांपासून पोटाच्या आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या जाणवत असतील तर सावध राहा. स्वतः उपचार न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.