Thane Traffic Issue Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Traffic Issue : ठाण्यातील रस्ते होणार 'ट्रॅफिक फ्री', मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले हे आदेश

Thane : ठाण्यातील रस्ते होणार 'ट्रॅफिक फ्री', मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले हे आदेश

Satish Kengar

Thane Traffic Issue : ठाण्यात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. यामुळे दरदरोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे, याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबई-नाशिक महामार्ग कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम 60 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तात्काळ

एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई- नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025 : गरबा खेळताना थकवा येणार नाही; फक्त 'या' ५ गोष्टी करा, एकदम फ्रेश वाटेल

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

Arjun Tendulkar : साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीत मोठा बदल; अवघ्या ३ चेंडूत द्रविडला दाखवला पव्हेलियनचा रस्ता

Donald Trump : हनुमान खोटा देव, आपण ख्रिश्चन आहोत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

तुमच्या बँकेकडून ऑनलाईन चेकबुक कसं ऑर्डर करायचं?

SCROLL FOR NEXT