Dombivli Crime News: डोंबिवलीत एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जिग्नेश जाधव असे या तरुणाचे नाव आहे.
हल्ला केल्यानंतर जिग्नेशने नाशिक येथे पळ काढला होता. पोलिसांना तो नाशिकला येथे असल्याचे माहिती मिळताच त्याला नाशिक येथे जाऊन बेड्या ठोकल्यात.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसह राहते. 14 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास महिला घराच्या दिशेने पायी जात होती. याचवेळी तिचा मित्र जिग्नेश तिला भेटला. त्याने महिलेला रस्त्यात अडवले आणि म्हणाला की, 'तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेल. तू माझ्यासोबत ये', असे तिला सांगितले. (Latest Marathi News)
मात्र महिलेने नकार देताच जिग्नेश संतापला त्याने आपल्याकडे असलेल्या चाकूने महिलेच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या हल्ल्यानंतर जिग्नेश पसार झाला होता. पोलीस जिग्नेश चा शोध घेत होते. तपासादरम्यान जिग्नेश नाशिकला लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाशिकला जाऊन शोध घेत जिग्नेशाला अटक केली. आरोपी जिग्नेशने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.