Water Metro
Water MetroSaam Tv

India's First Water Metro : जमिनीवर नाही पाण्यावर धावणार! 'ही' आहे भारतातील पहिली 'वॉटर मेट्रो', जाणून घ्या संपूर्ण माहिती

Water Metro: जमिनीवर नाही पाण्यावर धावणार! 'ही' आहे भारतातील पहिली 'वॉटर मेट्रो'
Published on

Water Metro: देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन धावताना तुम्ही पाहिलीच असेल. त्यातून तुम्ही प्रवासही केला असेल. मात्र आता देशात नव्या प्रकारची मेट्रो धावणार आहे. याला 'वॉटर मेट्रो' असे नाव देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 एप्रिल रोजी केरळमधील कोची येथे देशातील या वॉटर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. या वॉटर मेट्रोमुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे. (Latest Marathi News)

ही वॉटर मेट्रो कोचीमधील विविध भागांना वेगाने जोडेल. लोकांना कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वॉटर मेट्रोचा उपयोग होणार आहे. याद्वारे लोक कमी वेळ आणि कमी पैसे खर्च करून कोचीमध्ये प्रवास करू शकतील.

असं सांगितलं जात आहे की, ही केवळ भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील पहिली मेट्रो असेल जी पाण्यावर धावेल. कोचीमध्ये सुरू होणार्‍या वॉटर मेट्रोचे फोटो यापूर्वीच समोर आले आहे.

Water Metro
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 23 वॉटर मेट्रो बोटी आणि 14 टर्मिनल असणार आहेत. यापैकी 4 टर्मिनल वॉटर मेट्रो सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर वॉटर मेट्रो सेवेमध्ये 78 बोटी आणि 38 टर्मिनल असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com