ठाणेकरांची वाहतूक कोंडी लवकरच संपणार, मेट्रो ४ सुरू होणार
वडाळा ते कासारवडवली मार्गावर ३२ किमी उन्नत मेट्रो मार्ग
सप्टेंबरमध्ये ट्रायल रन, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू
घोडबंदर, मीरा-भाईंदरसह इतर मेट्रो मार्गांशी थेट जोडणी
Mumbai Metro Line 4 Update : दोन ते तीन महिन्यात ठाणेकरांची वाहतूक कोंडीमधून कायमची सूटका होणार आहे. घोडबंधर आणि परिसरातील वाहतूक कोंडी आता कायमची संपणार आहे. कारण, मुंबई मेट्रो लाईन 4 म्हणजेच वडाळा ते कापुरबावडी मेट्रो या वर्षाअखेरीस धावणार आहे. वडाळा ते कपुरबावडी जोडणारा कॉरिडॉर मेट्रो-4A म्हणून गायमुखपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. या मार्गावर सप्टेंबरमध्ये चाचणी सुरू होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ठाणे महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉननंतर बोलताना शिंदेंनी ठाण्याची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार असल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये मेट्रो ४ च्या याचपणीला सुरूवात होणार असल्याचे ते म्हणाले. "मुंबई मेट्रो लाईन चार वडाळा ते काबुरबावडी या मार्गाचा चाचणी सप्टेंबरमध्ये सुरू होईल. प्रत्यक्ष प्रवासी सेवा वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. " त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारेय. मात्र काम अजूनही 85 टक्केच पूर्ण झाल्यामुळे शिंदेंनी सांगितलेल्या वेळापत्रकावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतायत. (Metro 4 trial run Wadala to Kasarvadavali September)
मुंबई मेट्रो लाइन-4 ला मीरा-भाईंदर (मेट्रो-10) शी देखील जोडले जात आहे. येथून ही लाइन मुंबईतील इतर मेट्रो लाइन्सशी जोडली जाईल. यामुळे ठाण्यातील लोकांना आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल, असे शिंदेंनी सांगितले.
डिसेंबरमध्ये धावणार मेट्रो -
‘ठाण्यातील अंतर्गत मेट्रो लाइनवरील काम सध्या वेगात सुरू आहे. मेट्रो-4 सोबत इंटरचेंज स्टेशनांचा समावेश आहे, त्यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. गायमुख-माजीवाडा खंड (मेट्रो लाइन-4 अंशिक आणि 4ए) वर ट्रायल रन या वर्षअखेरीस सुरू होईल. पण विरोधकांकडून घोडबंदर खंड आणि मोगरपाडा कारशेडच्या बांधकामात होत असलेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
MMRDA अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉरिडॉरचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. पंतनगर-घाटकोपर बस स्टेशनवर ५८ मीटरचा स्टील स्पॅन या आठवड्याच्या शेवटी बसवला जाईल. मंडाले डेपो (लाइन 2B) मधून ४८ मेट्रो कोचेस लाइन 4 वर गायमुख आणि कॅडबरी दरम्यानच्या उंच भागात नेण्याची योजना आहे. त्यामुळे डेपोचे काम पूर्ण होण्याची वाट न पाहता ट्रायल रन आणि पूर्व-संचालनाचे काम करता येईल.
मुंबई मेट्रो लाईन 4 चा मार्ग वडाळा येथून सुरू होऊन घाटकोपर, मुलुंड, ठाणे मार्गे कासारवडवली येथे संपतो. ३२ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर ३० स्थानके असणार आहेत. हा पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग आहे. लाईन 2B (अमर महल जंक्शन), लाईन 5 (कापूरबावडी), लाईन 6 (गांधी नगर), लाईन 10 (गायमुख), आणि लाईन 11 (वडाळा/सीएसएमटी) या मेट्रो मार्गासोबत हा मार्ग जोडला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.