Rupali Chakankar : वेदनादायक!रक्षाबंधनालाच रूपाली चाकणकरांवर शोककळा, लाडक्या भावाचे निधन

Rupali Chakankar cousin Balraje Mali death news : महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मावस भावाचे रक्षाबंधनाला निधन झाले. रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे.
Rupali Chakankar cousin brother Balraje Mali death news
Rupali Chakankar cousin brother Balraje Mali death newsRupali Chakankar
Published On
Summary
  • रक्षाबंधनाच्या दिवशी रूपाली चाकणकर यांच्या मावस भावाचे निधन.

  • बाळराजे माळी यांना रूपाली चाकणकर यांची अखेरची श्रद्धांजली.

  • चाकणकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

Rupali Chakankar cousin brother Balraje Mali death news : शनिवारी राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पण त्याच दिवशी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. रूपाली चाकणकर यांच्या मावसभावाचे शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी निधन झाले. बाळराजे माळी असे त्यांचे नाव आहे. भावाच्या जाण्याने रूपाली चाकणकर यांचे कुटुंब शोकसागरात बुडालेय. चाकणकर यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले.

रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. या हृदयद्रावक घटनेने रक्षाबंधनाच्या आनंदावर विरजण पडले. रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित आपल्या मावसभावाला श्रद्धांजली वाहिली. "माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप देताना मन सुन्न झाले आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टने अनेकांच्या मनाला चटका लावला असून, अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून सांत्वनपर संदेश पाठवले आहेत.

Rupali Chakankar cousin brother Balraje Mali death news
महाराष्ट्रातील या ९ पक्षांची मान्यता कायमची रद्द, आयोगाचा मोठा निर्णय | VIDEO
बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास, काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.
रूपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा

बाळराजे माळी आणि रूपाली चाकणकर यांचे अतिशय जवळचे नाते होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह त्यांच्या निकटवर्तीयांनाही मोठा धक्का बसला आहे. चाकणकर यांनी या दुखद प्रसंगी आपल्या भावाला स्मरून त्याच्याशी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. रक्षाबंधनाच्या पवित्र सणात अशा दुखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवरही या घटनेची चर्चा सुरू असून, अनेकांनी चाकणकर यांना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rupali Chakankar cousin brother Balraje Mali death news
Khokya Bhosale : बीडमधील सर्वात मोठी बातमी, आरोपी खोक्याला जामीन मंजूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com