नारायण पवार यांनी शिंदे सेना शाखा प्रमुखाला कानाखाली मारल्याचा आरोप समोर आला.
या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली.
अलीकडील ‘ऑपरेशन लोटस’मुळे ठाण्यात भाजप–शिंदे सेना वाद आधीच चिघळलेला आहे.
या घटनेमुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
विकास काटे, ठाणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Why BJP and Shinde Sena leaders clashed at a Thane government event : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे. ठाण्यामध्ये या वादाचा पुढचा अंक सुरू झाला आहे. ठाण्यातील नेते भाजपने फोडल्यामुळे शिवसैनिक आधीच नाराज आहेत. त्यात आता ठाण्यामध्ये शिवसेनेच्या नेत्याला भाजपच्या नेत्याने मारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. सरकारी कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
भाजपच्या नेतयाने ठाण्यातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखाच्या कानशिलात लगावल्याच समोर आले आहे. भाजप माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवार यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे.त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. त्यातच आता भाजपच्या नेत्याने कानाखाली मारल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाण्यातील पाकपाडी परिसरात शासनाच्या घर निर्मिती योजनेच्या (bsup) जल्लोषादरम्यान एक वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात, शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानाखाली लगावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.' या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे भविष्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याच्या घोषणेनंतर आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदेंची ताकद असलेल्या ठाण्यात ऑपरेशन लोटस सुरू केले. शिंदेंच्या जवळच्या व्यक्तींना भाजपकडून फोडले जात आहे. मागील काही दिवसांत अनेक शिवसेना नेत्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. या प्रकारामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी आहेत. त्यातच आता शिवसेना शाखा प्रमुखाच्या कानाखाली मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजप नेत्याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे शिवसेना-भाजपचे नेते भिडले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.