Pune : पुण्यात नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटीची बोली, धक्कादायक माहिती समोर

Local Body Election News : पुण्यातील राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी तब्बल एक कोटींची बोली लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी बिनविरोध निवड करण्यासाठी लिलावाचा अजब निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Maharashtra Local Body Election
Maharashtra Local Body Electionx
Published On
Summary
  • महिला राखीव जागेसाठी बावीस लाखांची बोली लावल्याची माहिती समोर.

  • गावकऱ्यांनी प्रभागातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लिलावाचा निर्णय घेतला.

  • सर्वाधिक बोली लावणाऱ्या उमेदवाराला इतरांनी पाठिंबा देऊन माघार घेण्याचे ठरले.

  • लिलावातून मिळणारे पैसे गावातील मंदिर, सार्वजनिक इमारती आणि विकासकामांसाठी वापरण्याचा दावा.

रोहिदास गाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी

Rajgurunagar nagar parishd Election Auction : पुण्यातील राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याची चर्चा आहे. एका प्रभागात नगरसेवक पदासाठी गावकऱ्यांनी लिलाव केल्याचे वृत्त असून, सर्वसाधारण जागेसाठी एक कोटी रुपयांची, तर महिला राखीव जागेसाठी बावीस लाख रुपयांची बोली लागल्याची माहिती आहे. अनेक उमेदवार उभे राहून पैसे खर्च करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या लिलावातून जमा होणारे पैसे गावातील मंदिर आणि सार्वजनिक इमारतींच्या सुधारणेसाठी वापरले जातील, असा दावा केला जात आहे. हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. (Rajgurunagar Nagar Parishad election latest update)

राज्यात सध्या नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजगुरुनगर परिषदेच्या एका प्रभागामधील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला. निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, असे त्यांनी ठरवले. पण बिनविरोध निवडीसाठी त्यांनी अजब तोडगा काढला. त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण व महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार लिलावाद्वारे निवडायचे. जे उमेदवार या पदांसाठी जास्त बोली लावतील, त्यांना इतर सर्व उमेदवारांनी पाठिंबा देऊन आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे ठरले.

Maharashtra Local Body Election
Canara Bank Robbery : कॅनरा बँक दरोडा प्रकरणात हादरणारा ट्विस्ट, असिस्टंट मॅनेजरनंच दीड कोटींवर हात साफ केला, धक्कादायक कारण समोर

सर्वांत जास्त बोली लावणारे दोन्ही उमेदवार आता या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरसेविका होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी ठरल्याप्रमाणे बाकीच्या उमेदवारांनी माघार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा सर्व बोलीचा प्रकार प्रत्यक्षात येणार की नाही, हे माघारीनंतरच स्पष्ट होईल. या बोलीचे पैसे गावाच्या स्वाधीन करून ते गावातील विकासकामांवर व परिसर सुधारण्यावर तसेच सार्वजनिक इमारतींची सुधारणा करण्यावर खर्च करण्याचा गावकऱ्यांनी ठरवले आहे. मात्र असा लिलाव झाल्याच्या माहितीला अधिकृतपणे दुजोरा देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

Maharashtra Local Body Election
पोलीस की हैवान! मग्रूर अधिकाऱ्यानं हद्द पार केली, गरोदर महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com