मरीन ड्राइव्हवर पोलिसाने गरोदर महिलेच्या अंगावर स्कूटर चालवण्याचा प्रयत्न केला.
वाहतूक वादातून महिला चालान भरण्यास तयार असतानाही पोलिसाने मग्रूरी दाखवली.
महिलेच्या हात-पायांना दुखापत झाली असून तिची प्रकृती बिघडल्यावरच पोलिसाने गाडी थांबवली.
या घटनेवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी वाढली आहे.
Pregnant woman injured after cop’s reckless action in Patna traffic violation case : बिहारची राजधानी पाटण्यात पोलिसांचे लज्जास्पद वर्तन समोर आले आहे. येथील मरीन ड्राइव्हवर एका पोलिसाने गरोदर महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली आहे. पोलीस आहे की हैवान असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मरीन ड्राईव्हवर महिलेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. पण त्या महिलेने चालान भरण्यासाठी होकार दिला, पण त्या पोलिसाची मग्रूरी वाढली. बाचाबाचीनंतर त्याने त्या महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मी गरोदार आहे... असे महिला वारंवार त्यांना सांगत होती, पण पोलिसाने हद्द पार केली.
चालान जारी करताना बाचाबाची झाली. संतापलेल्या पोलिसाने गर्भवती महिलेवर आपली स्कूटर चालवण्यास सुरुवात केली. महिला मी गर्भवती असल्याचे वारंवार सांगत होती. पण त्याने काहीही ऐकले नाही. तो स्कूटर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाऊ लागला, महिलेने चालान भरण्याची तयारी दर्शवली. पण त्याने काहीही ऐकले नाही. त्या मिहलेने स्कूटरसमोर जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या पोलिसाने अंगावरच स्कूटर चालवण्यास सुरुवात केली. त्या गरोदर महिलेला दुखापतही झाल्याचे समोर आलेय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना सोमवारी संध्याकाळी पाटण्याच्या मरीन ड्राइव्हवर झाली. पोलिसाचे हे कृत्य पाहून रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती संतापला होता. राँग साईडने का निघालात म्हणून पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर या वादाला सुरूवात झाली. गर्भवती महिला आणि पोलिसांचा प्रचंड वाद झाला. महिलेने आपण चालान भरण्यासाठी तयार असतानाही पोलिसाने काहीही ऐकले नाही.
मी गर्भवती आहे, कृपया असे करू नका, अशी विनवणी ती महिला वारंवार करत होती. पण पोलिसाला काहीही फरक पडला नाही. पोलीस स्कूटरवर बसला अन् पोलिस स्टेशनला घेऊन निघाला. महिला त्याच्या पुढे आली. पण त्याने काही विचार केला नाही. पोलिसाने स्कूटर त्या महिलेच्या अंगावर घातला. गरोदर महिलेच्या हाताला आणि पायांना दुखापत झाली. तिची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आल्यावरच पोलिसाने गाडी थांबवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.