ठाण्याच्या कोलशेतमधील लोढा अमारा 4 हजारांहून सदनिका असलेल्या सोसायटीत विकासकाकडून अनेक नियमांचा भंग होतं असल्याचा आरोप करत रहिवाशांनी आंदोलन केलं आहे. रहिवाशांच्या सुविधेसाठी राखीव असलेल्या जागेत सिग्नेट-2 हे व्यापारी संकुल उभारण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून ठाणे महापालिकेकडून परवानगी मिळवल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याबाबत उपनिबंधकाकडे तक्रार कारण्यात आली आहे. या विकासकाला करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
लोढा अमारा इमारतीमधील रहिवाशांचा आरोप आहे की, या व्यावसायिक संकुलासाठी मिळवलेली परवानगी बनावट आहे. लोढाने टीएमसीकडे मंजुरी मिळवताना अस्तित्वात नसलेल्या फेडरेशनचे बनावट एनोसी सादर केले आहे. प्रत्यक्षात कुठलीही अधिकृत फेडरेशन अस्तित्वात नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
विकासकाने फॅसिलिटी चार्जेस अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट (FCAM) संबंधित गंभीर गैरप्रकार केले आहेत. फ्लॅटचे ताबा २०१८ मध्ये दिल्यानंतर ५ वर्षांचे FCAM आगाऊ घेतले गेले, आणि त्यानंतर दरही जवळपास दुप्पट वाढवले. मात्र, या दरवाढीच्या कोणत्याही खर्चाचा लेखापरीक्षित (Audited finace statement) तपशील आजपर्यंत सादर करण्यात आलेला नाही.
करारानुसार, विकसकाने दरवर्षी ३० जूनपूर्वी FCAM चा ताळेबंद करणे आणि त्याचे स्वतंत्र खाते ठेवणे बंधनकारक होते. मात्र हे सर्व नियम पायदळी तुडवत, लोढा आता वाढवलेल्या दरानुसार पैसे वसूल करण्यासाठी रहिवाशांवर अन्यायकारक दबाव टाकत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. स्वतंत्र FCAM खाती न ठेवता खर्चाचा अपारदर्शक वापर केला गेला. सदर प्रकरण अपील लवादाकडे आणि रेराकडे प्रलंबित आहे. या विरोधात तीन महिन्यांपूर्वीही आंदोलन करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.