Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाने आयुष्य संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ, मठात दुपारी जेवण केलं अन्

Famous Director ashish ubale News : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आयुष्य संपवलं आहे. त्त्यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत खळबळ उडालीये.
Famous Director ends life News
Famous Director ends life Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपुरातील रामकृष्ठ मठात शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिष उबाळे हे शुक्रवारी सायंकाळी भावाला भेटायला नागपुरात आले होते. त्यानंतर शनिवारी सांयकाळी साडेचार वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे होते. त्यांनी एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. एफटीआयमधून अभ्यास पूर्ण केल्यानंतर मुंबईत नशीब आजमविण्यास सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं होतं.

उबाळे यांनी श.ना. नवरे यांच्या कथांवर आधारित मालिकेचे दिग्दर्शक केले. गजरा, अग्नी, एक श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्युह या मालिकांचेही दिग्दर्शन केलं आहे. तर गार्गी, आनंदाचे डोही, बाबूरावला पकडा हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

Famous Director ends life News
Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; पक्षातील १५ शिलेदारांनी साथ सोडली, दिल्लीत 'ठाकरे' पॅटर्न

उबाळे यांनी दिग्दर्शित केलेला कार्ल्सबर्ग चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. त्यांचे गार्गी आणि आनंदाचे डोही हे दोन्ही चित्रपट पडद्यावर आले नाहीत. एका दशकापूर्वी ते नामवंत दिग्दर्शक होते. त्यानंतर त्यांना सिनेसृष्टीतून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा कर्जबाजारीपणाही वाढला होता. त्यामुळे आशिष उबाळे निराशेच्या गर्तेत गेले होते.

Famous Director ends life News
Industrial Accident : शारीरिक संबंधादरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला झटका, कुटुंबीयांना मिळणार भरपाई

आशिष उबाळे यांचा लहान भाऊ रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करत होता. भावाला भेटण्यासाठीच आशिष उबाळे आले होते. ते गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होते. त्यापूर्वी त्यांनी मठामध्ये जेवणही केलं होतं. दुपारी आराम करण्यासाठी गेले. त्यानंतर रूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Famous Director ends life News
Uddhav Thackeray : देशात भाजप राहणार नाही, पण...; भारत-पाकिस्तान तणावावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

त्यांचा भाऊ सारंग शनिवारी सायंकाळी रुममध्ये उठवण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी रूम उघडली नाही. त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपास केला असता त्यावेळी आशिष उबाळे यांनी स्वतःलाच व्हॉट्सअपवर नोट पाठवल्याचे आढळले. त्यामध्ये कर्ज असल्याचे सांगत आत्महत्या केल्याचं उघड झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com