Thane Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Thane Police: ठाणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज विकताना डिलिव्हरी बॉयसह आणखी एकाला अटक केली. त्याच्याकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

Priya More

Summary -

  • डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या साथीदाराला ठाण्यात ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह अटक.

  • अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत २ किलोहून अधिक ड्रग्ज जप्त.

  • आरोपी पनवेल आणि शिळ दायघर परिसरातील आहेत.

  • ड्रग्ज कुणाला विकले याचा शोध पोलिस घेत आहेत.

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका डिलिव्हरी बॉयला ड्रग प्रकरणात अटक केली आहे. ठाणे पोलिसांनी ड्रग्जविरुद्ध मोहिम सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अनेक कारवाई करण्यात आल्या, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ड्रग्ज देण्यासाठी येत असलेल्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी सापळा रचत अटक केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ठाणे अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंब्रा आणि शील डायघरजवळ एक डिलिव्हरी बॉय ड्रग देण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून दोन किलोपेक्षा जास्त ड्रग जप्त केले. या ड्रग्जची किंमत जवळपास ४ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पनवेलचा रहिवासी असलेला आरोपी इरफान अमानुल्ला शेख (वय ३६ वर्षे) हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो मुंब्रा येथे ड्रग्ज देण्यासाठी आला होता. तर दुसरा आरोपी शील डायघर शाहरुख मेवाशी उर्फ रिजवान (वय २८ वर्षे) हा मेकॅनिक म्हणून काम करतो. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत कुणाला कुणाला ड्रग्ज पुरवले होते. तसंच आता त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले ४ कोटींची ड्रग्ज ते कुणाला विकण्यासाठी आले होते याचा शोध पोलिस घेत आहेत. अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाची ही मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी विविध भागात गस्त घालताना अमली पदार्थ पुरवठादार आणि तस्करांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्याची मालिका सुरूच आहे. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुंब्रा आणि शिळ-दायघर येथून अनेक आरोपींना अटक केली आहे आणि कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Ayurveda Health Care: शिळं अन्न खाताय? ३ तासातच होतील आरोग्यावर परिणाम; आयुर्वेदाचा इशारा

Navratri Fasting Tips: नवरात्रीचा उपवास सोडताना काय खावे अन् काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT