Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे गावातील डॉक्टरसोबत प्रेमसंबंध होते. नवऱ्याने तिला फोनवर बोलताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिने हे धक्कादायक कृत्य केले.
Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला जिवंत जाळलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. बायकोला दुसऱ्या पुरूषासोबत फोनवर बोलताना नवऱ्याने रंगेहाथ पकडले होते. त्यावरून झालेल्या वादानंतर महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला पण अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.

एका वर्षापूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर बायकोचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर सुरू होते. नवऱ्याने बायकोला फोनवर बोलताना पकडले होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. या वादातूनच बायकोन आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळले. शेजारी राहणाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना कळवले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. तरुणाची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान सातव्या दिवशी त्याने प्राण सोडले.

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं
Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून ड्रॅग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त; ४०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त, कर्नाटक कनेक्शन उघड

तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन दोघाट पोलिस ठाण्यात पोहचले. त्याठिकाणी त्यांनी धरणे आंदोलन करत न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला पण अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं
Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सनी होते. तो बागपतच्या कंडारा गावचा रहिवासी होता. तो गावातच एक सार्वजनिक सेवा केंद्र चालवत होता. त्याचे एका वर्षापूर्वीच आरोपी महिलेसोबत लग्न झाले होते. सनीच्या वडिलांनी आरोप केला की, सनी माझा एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्न एक वर्षापूर्वी अंकिताशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यात अंकिताचे गावातील डॉक्टर अय्युबशी प्रेमसंबंध जुळले. माझ्या मुलाने अंकिताला फोनवर बोलताना अनेकदा पाहिले होते. त्याने अंकिताला डॉक्टरशी बोलू नये यासाठी अडवले होते. ही त्याची चूक होती. त्यानंतर पती-पत्नीमधील संबंध बिघडत गेले.'

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं
Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

२२ जुलै रोजी सनी बाईकवरून कावड यात्रेसाठी हरिद्वारला जात होता. वाटेत तो गढी कांगरान स्टेशनवर थांबला. यावेळी त्याच्या सासरच्या लोकांनी त्याला घेरले आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला जबरदस्तीने गावात नेले आणि त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. तो ८० टक्के भाजला होता. सुरूवातीला त्याला बिनौली सीएचसीमध्ये नेण्यात आले. तिथून त्याला मेरठ आणि नंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तो वाचू शकला नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं
Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com