Thane-Belapur Road Saam tv
मुंबई/पुणे

Thane-Belapur Road: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वाहतूक कोंडी फुटणार; ठाणे-बेलापूर मार्गावर होणार 3 उड्डाणपूल

Thane-Belapur Highway 3 Flyover Work: ठाणे-बेलापूर महामार्गावर ३ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

ठाणे-बेलापूर महामार्गावर ३ उड्डाणपूल बांधणार

वाहतूक कोंडीपासून सुटका होणार

पाम बीचजवळ दुहेरी भुयारी मार्ग बांधणार

नवी मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे ते बेलापूर महामार्गावर तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे बेलापूर महामार्गावर तीन उड्डाणपूल (Thane-Belapur Flyover)

ठाणे बेलापूर महामार्गावरील रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. याचसोबत पाम बीच मार्गाच्या शेवटी दुहेरी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. किल्ले जंक्शन येथे सिग्नलमुक्त वाहतूकीसाठी भुयारी मार्गाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. काल झालेल्या महासभेत हा ठराव मंजूर केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोलीच्या खाडी जोड पुलामुळे खूप जास्त वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरुन नवी मुंबईत येणारी वाहने खूप आहेत. त्यामुळे या परिसरात खूप वाहने येतात. त्याचसोबत पुनर्विकास प्रकल्पामुळे वाहतुकीवरचा ताण वाढत आहे. यात पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. बेलापूर मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपुल आणि भुयारी मार्ग उभारण्यात प्रस्ताव मांडला आहे.

तीन उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाच्या प्रकल्पांची अंबलबजावणी हायब्रिड अॅन्युटी मॉडेल पद्धतीने केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी ३० टक्के रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर दिली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर १० वर्षात ही रक्कम दिली जाईल. जेणेकरुन अर्थसंकल्पावर ताण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

ठाकरे गटाचे आणखी आमदार, खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या ‘मिशन टायगर’ विधानाने राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT