Rajul Suresh Patel Join Shinde Group  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे देणार मोठा झटका; ७ वर्षे 'ती' शपथ पाळणाऱ्या उपनेत्या हाती घेणार धनुष्यबाण

Rajul Suresh Patel Join Shinde Group : महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागत असतानाच ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के मिळू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा झटका दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे, साम प्रतिनिधी

ठाकरे गटाला शिंदेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा धक्का दिलाय. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ घेणाऱ्या शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल ह्या शिवबंधन तोडणार आहेत. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले शिवसेना उपनेत्या राजुल पटेल आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्याआधीच ठाकरे गटाला एकानंतर एक धक्के बसू लागले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत. पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत, पण दुसऱ्या बाजुला त्यांना एकानंतर एक धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यानं राजुल पटेल ह्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शिवबंधन तोडत हाती धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्येही एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता.डोंबिवलीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटाने खिंडार पाडले. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. अनेक मातब्बर नगरसेवक,पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.

आता या यादी राजुल पटेल यांच्या नावाचा समावेश झालाय. राजुल पटेल ह्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या आहेत. पटेल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणं ही, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रतिज्ञेमुळे राजुल पटेल आल्या चर्चेत

जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा शिवसेनेच्या महिला विभागसंघटक व पालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल घेतली होती. पटेल यांनी तब्बल सात वर्ष प्रतिज्ञेचं पालन केलं होतं. जोपर्यंत या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असं पण त्यांनी केला होता. सात वर्षे अनवाणी फिरणाऱ्या राजुल पटेलांना अनेक जणांनी त्यांना या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला होता पण त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT